ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांच्यावरील हल्ल्याच्या निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:26+5:302021-06-26T04:20:26+5:30

चंद्रपूर : राजस्थानमधील पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा व त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या ...

Protest against attack on Tree Man of India Vishnu Lamba | ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांच्यावरील हल्ल्याच्या निषेध

ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांच्यावरील हल्ल्याच्या निषेध

Next

चंद्रपूर : राजस्थानमधील पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा व त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेध करीत इको-प्रोनो पठाणपुरा गेटजवळ मूक निदर्शने केली.

मागील आठवड्यामध्ये ट्री मॅन ऑफ इंडिया नावाने प्रसिद्ध असलेले विष्णू लांबा व त्यांचे सहकाऱ्यांवर गावातील काही असामाजिक तत्त्वाकडून शस्त्राद्वारे हल्ला करण्यात आला. या घटनेत विष्णू लांबा गंभीर जखमी झाले असून बचाव करण्यास आलेल्या सहकाऱ्यांवरही हल्ला झाल्याने ते सुद्धा गंभीर झाले आहे. अवैध वृक्ष तोडीला विरोध करण्यास गेले असता ही घटना घडली. या घटनेचा निषेध म्हणून चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक पठाणपुरा गेट समोर इको-प्रो संस्थेच्या सदस्यांनी मूक निदर्शने केली.

यावेळी दोषींवर तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली असून यासंबंधीचे निवेदन राजस्थानच्या मुख्यमंत्र्याकडे पाठविण्यात आले आहे.

यावेळी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात रवी गुरनुले, धर्मेंद्र लुणावत, अब्दुल जावेद, बिमल शहा, अभय अमृतकर, राजू काहीलकर, राजेश व्यास, कपिल चौधरी, प्रमोद मलिक, जयेश बैनलवार, सचिन धोतरे, सुमित कोहले, अमोल उत्तलवार, सचिन भांदककर आदी सदस्य सहभागी झाले होते.

Web Title: Protest against attack on Tree Man of India Vishnu Lamba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.