कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:52 PM2018-01-19T23:52:10+5:302018-01-19T23:52:29+5:30

कोरेगाव भीमा येथील भ्याड हल्ल्यातील प्रमुख आरोपी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना त्वरित अटक करण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी ओबीसी, लोकशाहीवादी, मानवतावादी, पुरोगामी, आंबेडकरवादी पक्षांतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.

To protest against the constitution of Koregaon Bhima | कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ धरणे

कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ धरणे

Next
ठळक मुद्देआरोपींना अटक करा : विविध संघटनांचा सहभाग

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : कोरेगाव भीमा येथील भ्याड हल्ल्यातील प्रमुख आरोपी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना त्वरित अटक करण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी ओबीसी, लोकशाहीवादी, मानवतावादी, पुरोगामी, आंबेडकरवादी पक्षांतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या बहुजन समाजाच्या लोकांवर भ्याड हल्ला करण्यात आला. या घटनेला संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे जबाबदार आहेत. आज या घटनेला २० दिवस होत आहेत. परंतु अद्यापही या दोघांनाही अटक करण्यात आलेली नाही. त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ओबीसी, आदिवासी, मुस्लिम, बौद्ध, दलित आणि आंबेडकरवादी चळवळीच्या लोकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन दिवसभर धरणे दिले. जिल्हाधिकाºयांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी सत्यशोधक परिषदेचे हिराचंद बोरकुटे, माकपाचे रमेशचंद्र दहीवडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष नंदू नागरकर, नामदेव किन्नाके, सचिन राजूरकर, किशोर पोतनवार, बबनराव फंड आदी उपस्थित होते.

Web Title: To protest against the constitution of Koregaon Bhima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.