पेन्शन मागणाऱ्या शिक्षकांना अटक करणाऱ्या शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 05:00 AM2021-12-29T05:00:00+5:302021-12-29T05:00:53+5:30
खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच खाजगी आश्रम शाळेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व इतर समस्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व विदर्भ शिक्षक संघद्वारा नुकतेच शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जुनी पेन्शन योजनेच्या समर्थनार्थ मुंबई येथे काढण्यात आलेल्या मोर्चातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अटक केल्या प्रकरणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने निषेध केला असून, यासंदर्भात शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच खाजगी आश्रम शाळेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व इतर समस्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व विदर्भ शिक्षक संघद्वारा नुकतेच शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते व्ही. यु. डायगव्हाणे यांच्या मार्गदर्शनात प्रांतीय अध्यक्ष श्रावण बरडे व सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी शासनाला निवेदन पाठविले आहे.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळा, तुकडीवर नियुक्त शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची कुटुंब निवृत्तिवेतन योजना लागू करून त्यांच्या प्रलंबित ६ व्या वेतन आयोगाचा तिसरा, चौथा, पाचवा हप्ता तत्काळ अदा करणे आदी मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांना देण्यात आले.
याप्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक महामंडळाचे सहसचिव जगदीश जूनगरी, जिल्हाध्यक्ष केशव, कार्याध्यक्ष लक्ष्मण धोबे, कार्यवाह श्रीहरी शेंडे, दिगांबर कुरेकर, गंगाधर कुंघाडकर, मनोज वासाडे, सुरेंद्र अडबाले, देवराव ढवस, कालिदास बोबडे, अजय शास्त्रकर, देवराव लांबाडे, मुख्याध्यापक हरिहर भांडवलकर, सुरेखा खरतड, वसंत खुळसंगे, साईनाथ शिरसे, प्रवीण अबोजवार, लक्ष्मण एकरे, देवेंद्र बलकी, संदीप सातपुते, शकील, निखाडे, के. के. कोरडे, नंदकिशोर महोरकर, गणेश सूत्रपवार, विखार उपस्थित होते.