ठाकरे सरकारच्या निषेधार्थ चंद्रपुरात भाजपनेत्यांचे घरासमोर निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:35 PM2020-05-22T12:35:55+5:302020-05-22T12:37:53+5:30

भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास आपापल्या घराच्या अंगणात भाजप कार्यकर्त्यांसह हातात राज्य सरकारविरोधी घोषणा असलेले फलक घेऊन आंदोलन केले.

Protest agitation in front of BJP leaders' house in Chandrapur to protest against Thackeray government | ठाकरे सरकारच्या निषेधार्थ चंद्रपुरात भाजपनेत्यांचे घरासमोर निषेध आंदोलन

ठाकरे सरकारच्या निषेधार्थ चंद्रपुरात भाजपनेत्यांचे घरासमोर निषेध आंदोलन

Next
ठळक मुद्देमाजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्यासह कार्यकर्ते सहभागीनिषेधार्थ सगळ्यानी लावले मास्क

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर:   भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास आपापल्या घराच्या अंगणात भाजप कार्यकर्त्यांसह हातात राज्य सरकारविरोधी घोषणा असलेले फलक घेऊन आंदोलन केले. हे आंदोलन करताना माजी मंत्र्यांसह कार्यकर्त्यांनी आपल्या तोंडावर काळे मास्क लावले होते.
राज्य सरकार लॉकडाऊनची स्थिती व कोरोनाची लागण रोखण्यात अपयशी झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दररोज वाढता असण्यामागे सरकारचे निष्काळजीपण आहे. हे सरकार निर्णय घेण्यास सक्षम नाही असे आरोप भाजपाच्या आंदोलकांनी यावेळी केले होते. हाती निषेधाचे फलक घेतलेले व तोंडाला मास्क लावलेले कार्यकर्ते आणि नेते यांनी, यावेळी सरकारविरोधी घोषणा दिल्या.

Web Title: Protest agitation in front of BJP leaders' house in Chandrapur to protest against Thackeray government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.