विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सीटीपीएससमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:54 PM2017-10-26T23:54:38+5:302017-10-26T23:55:35+5:30

विदर्भ क्षेत्र सर्वच बाबतीत संपन्न असताना ५७ वर्षे महाराष्ट्रात राहून राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे शेती, उद्योग, व्यापार, वीज, सिंचन, रोजगार, कल्याणकारी व लाभाच्या योजना या सर्वच क्षेत्रात मोठे शोषण झाले आहे.

A protest movement against the CTP of the Vidarbha State Movement Committee | विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सीटीपीएससमोर ठिय्या आंदोलन

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सीटीपीएससमोर ठिय्या आंदोलन

Next
ठळक मुद्देसंघर्षासाठी तरुणांनी पुढे यावे : वामनराव चटप यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विदर्भ क्षेत्र सर्वच बाबतीत संपन्न असताना ५७ वर्षे महाराष्ट्रात राहून राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे शेती, उद्योग, व्यापार, वीज, सिंचन, रोजगार, कल्याणकारी व लाभाच्या योजना या सर्वच क्षेत्रात मोठे शोषण झाले आहे. आता आपल्यावरील अन्यायाविरुद्ध वैदर्भीय जनतेने आणि आपल्या न्याय हक्कासाठी तरुणांनी पुढे येऊन संघर्षाचे बिगुल फुंकावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जेष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले.
चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारापुढे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे व आदी मागण्यांसाठी बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप बोलत होते. शेतकºयांना संपुर्ण कर्जमुक्ती मिळावी, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा, अशी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या घोषणेची पुर्तता करावी, विजेचा दर निम्मे करावे, भारनियमन बंद करावे, विदर्भातील कोळशावर आधारीत नवीन १३२ वीज प्रकल्पाची मान्यता रद्द करावी, महिलांवरील माईक्रोफायनान्सचे कर्ज संपवावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी विधानसभेचे माजी उपसभापती अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, संयोजक राम नेवले, माजी मंत्री डॉ. रमेश गजबे, किशोर पोतनवार, हिराचंद बोरकुटे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, अरुण केदार, पुरुषोत्तम पाटील, अयुबभाई कच्छी, रफिक रंगरेज, मितीन भागवत, अनिल ठाकुरवार, अ‍ॅड. अरुण धोटे, प्रभाकर दिवे, निळकंठ कोरांगे, मसुद अहमद, राजेंद्र झोटींग, रंजना मामर्डे, राजश्री झोटींग यांच्यासह अनेक नेते व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, स्वतंत्र विदर्भ झाल्यास सक्षम आणि स्वयंपुर्ण स्वतंत्र राज्य निर्माण होणार आहे. राम नेवले म्हणाले, गेली ५७ वर्ष विदर्भ महाराष्ट्रात राहून आणि सोन्याची कोंबडी समजली जाणारी मुंबई सोबत असूनही विदभार्चा विकास का झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणाचा निषेध नोंदविला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: A protest movement against the CTP of the Vidarbha State Movement Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.