संडे मार्केटला गंजवॉर्डवासीयांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 09:18 PM2019-01-05T21:18:09+5:302019-01-05T21:18:37+5:30

शहरात डॉ.आंबेडकर चौक ते बिनबा गेट येथे रविवारी भरणारा संडे मार्केट गंजवॉर्ड येथे भरविण्याचा ठराव मनपाने घेतला. परंतु हा ठराव पारित करताना मनपा प्रशासनाने गंजवॉर्ड परिसरातील रहिवाशांंना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे मनपाचा ठराव एकतर्फी असून गंजवॉर्डवासीयांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे हा ठराव रद्द करून संडे मार्केट दुसऱ्या ठिकाणी भरवावे, अशा आशयाचे निवेदन परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.

The protesters of the Ganjawardes people on Sunday Market | संडे मार्केटला गंजवॉर्डवासीयांचा विरोध

संडे मार्केटला गंजवॉर्डवासीयांचा विरोध

Next
ठळक मुद्देआयुक्तांना निवेदन : इतर ठिकाणी हलविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरात डॉ.आंबेडकर चौक ते बिनबा गेट येथे रविवारी भरणारा संडे मार्केट गंजवॉर्ड येथे भरविण्याचा ठराव मनपाने घेतला. परंतु हा ठराव पारित करताना मनपा प्रशासनाने गंजवॉर्ड परिसरातील रहिवाशांंना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे मनपाचा ठराव एकतर्फी असून गंजवॉर्डवासीयांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे हा ठराव रद्द करून संडे मार्केट दुसऱ्या ठिकाणी भरवावे, अशा आशयाचे निवेदन परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.
शहरातील गंजवॉर्ड येथे पूर्वीपासून धान्य बाजार व भाजी बाजार असल्याने दिवसभर जडवाहतुकीची मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे सततच्या वाहतुकीमुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच भाजी बाजार असल्यामुळे सडणाºया भाज्यांच्या दुर्गंधीचा सामना गंजवॉर्डवासियांना करावा लागतो. तसेच गंजवार्ड या भागात अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची दवाखाने आहेत. बºयाच गंभीर रुग्णांना त्यांच्या दवाखाण्यात भरती करताना वाहतुकीमुळे मोठी अडचण जाते.
सोमवार ते शनिवार या मार्गावर बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात रहदारी राहते. केवळ रविवारी परिसरातील नागरिकांना ध्वनी प्रदूषण, वाहतूकीची अडचण यापासून मुक्ती मिळत होती. मात्र आता मनपाने रविवारी संडे मार्केट गंजवॉर्डात भरविण्याचा ठराव घेतला. मात्र ठराव घेताना परिसरातील नागरिकांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संडे मार्केटला विरोध करीत हा ठराव रद्द करावा, व संडे मार्केट इतर ठिकाणी भरविण्यात यावा, अशी मागणी केली. निवेदन देताना नगरसेवक संजय कचर्लावार, अ‍ॅड अभय पाचपोर, सादिक हुसेन, राजू नंदनवार, विरु यमलवार, प्रभाकर पटकोटवार आदी उपस्थित होते.

Web Title: The protesters of the Ganjawardes people on Sunday Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.