क्रांती महिला संघटनेतर्फे महागाईविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:45+5:302021-06-11T04:19:45+5:30

टाळेबंदी काळात केंद्र शासनाने डिझेल, पेट्रोलसह घरगुती गॅसचीही भाववाढ केली. हाती रोजगार उपलब्ध नसताना दोन वेळचे जेवण मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या ...

Protests against inflation by Kranti Mahila Sanghatana | क्रांती महिला संघटनेतर्फे महागाईविरोधात निदर्शने

क्रांती महिला संघटनेतर्फे महागाईविरोधात निदर्शने

Next

टाळेबंदी काळात केंद्र शासनाने डिझेल, पेट्रोलसह घरगुती गॅसचीही भाववाढ केली. हाती रोजगार उपलब्ध नसताना दोन वेळचे जेवण मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या नागरिकांना आता महागाईच्या भस्मासुराने जीवन जगणे अवघड केले आहे. अशा बिकट परिस्थितीतही केंद्र शासनाने आपल्या अडेलतट्टू धोरणावर तटस्थ राहून पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ केल्याने याचा आर्थिक फटका सर्वसामान्यांना बसत आहे. केंद्र शासनाच्या या धोरणाचा विरोध करत महिला क्रांती संघटनेच्या वतीने स्थानिक पेट्रोल पंपावर निदर्शने करून भाववाढीचा तीव्र निषेध नोंदविला. व महागाई कमी करण्यासंदर्भात गोंडपिपरीचे तहसीलदार के.डी. मेश्राम यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने विठ्ठलवाडा ग्रामपंचायत सदस्य तथा महिला संघटनेच्या रेखा रामटेके, दर्शना एकनाथ दुर्गे, वनिता वाघाडे व संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

===Photopath===

100621\img-20210607-wa0026.jpg

===Caption===

गोंडपिपरी तहसीलदारांना निवेदन सादर करताना क्रांती महिला संघटनेच्या पदाधिकारी

Web Title: Protests against inflation by Kranti Mahila Sanghatana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.