नवाब मलिक यांच्या अटकेच्या विरोधात जिल्ह्यात निषेध सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 05:00 AM2022-02-26T05:00:00+5:302022-02-26T05:00:31+5:30
ना. मलिक यांच्या अटकेनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा, वरोरा, जिवती, गडचांदूर आदी विविध ठिकाणीही निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार विनाकारण राज्यातील मंत्र्यांना त्रास देत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार असल्याने पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मंत्री नवाब मलिक यांची इडीने चौकशी करून त्यानंतर अटक केली. या घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूर येथील गांधी चौकामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येत केंद्रसरकारचा निषेध नोंदविला. केंद्र सरकार सुडबुद्धीने कारवाईत अडकवत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
ना. मलिक यांच्या अटकेनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा, वरोरा, जिवती, गडचांदूर आदी विविध ठिकाणीही निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार विनाकारण राज्यातील मंत्र्यांना त्रास देत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार असल्याने पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
चंद्रपूर येथील गांधी चौकामध्ये यावेळी घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाप्रसंगी खासदार बाळु धानोरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गि-हे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रामु तिवारी, प्रवीण पडवेकर, राजीव कक्कड, बेबीताई उईके, शालिनी महाकुलकार, ज्योती रंगारी, दीपक जैस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वरोरा येथील आंदोलन आ. प्रतिभा धानोकर, ॲड. मोरेश्वर टेमुर्डे, शिवसेनेचे मुकेश जिवतोडे यांच्याह महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.