नागभीडमध्ये मोर्चा काढून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:00 AM2020-01-08T06:00:00+5:302020-01-08T06:00:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : तालुक्यातील विविध संघटनाच्या वतीने नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात मंगळवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : तालुक्यातील विविध संघटनाच्या वतीने नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात मंगळवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी तहसीलदार चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चाची सुरूवात जुन्या बसस्थानपासून करण्यात आली. विविध घोषणा देत हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आला. या कायद्यामुळे भारतीय नागरिकांचे नागरिकत्व संपुष्टात येईल व भारतीय नागरिक मुलभूत अधिकारापासून वंचित होईल, अशी भिती यावेळी व्यक्त करण्यात आली. या मोर्चात मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, नागभीड तालुक्यातील मुस्लिम महिला पहिल्यांदाच मोर्चात सहभागी झाल्या. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी ुउपस्थितांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर तहसिलदार मनोहर चव्हाण यांना शिष्टमंडळाने निवेदन देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
मार्चाचे आयोजन डार्विन कोब्रा, शाहरूख शेख तसेच विविध संघटनांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी मोर्चात प्रामुख्याने जहागीर कुरेशी, पंजाबराव गावंडे , प्रा. डॉ. अनमोल शेंडे, तेरेंश कोब्रा, अॅड. आनंद घुटके, अॅड. देविदास करकाडे, गुलजार धम्मानी, इकबाल करीया, शिराज जादा, हमजू शेख, युनूश, रफी शेख, दिनेश गावंडे, ईलियास बकाली यांच्यांसह तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
मुस्लिम महिलांचा लक्षणीय सहभाग
या मोर्चाच्या निमित्ताने शहरातील मुस्लिम महिला पहिल्यांदाज रस्त्यावर उतरल्याचे दिसले. नागभीड मध्ये आजपर्यंत अनेक मोर्चे, आंदोलन झाली. मात्र एकदाही मुस्लिम महिलांनी यामध्ये सहभाग घेतला नसल्याचे जाणकारांचे मत आहे. यावेळी मात्र मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेत नागरिकत्व कायद्याला आपला विरोध दर्शविला.