गॅस दरवाढीच्या निषेधार्थ मूल येथे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:43+5:302021-07-03T04:18:43+5:30
मूल : घराघरांत स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढविल्याने सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झालेले आहे. ...
मूल : घराघरांत स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढविल्याने सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झालेले आहे. वाढलेले दर कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस, मूलच्या वतीने करण्यात आली. लक्ष वेधण्यासाठी मूल येथील गॅस एजन्सीसमोर निदर्शने करण्यात आली व उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान यांना निवेदन पाठविण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुमित समर्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा रयत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष निपचंद शेरकी, महिला तालुकाध्यक्ष नीता गेडाम, महिला शहराध्यक्ष अर्चना चावरे, चांदापूरचे उपसरपंच अशोक मार्गनवार, हेमंत सुपनार, भास्कर खोब्रागडे, प्रभाकर धोटे, गुरुदास गिरडकर, महेश जेंगठे, विनोद आंबटकर, अक्षय पुपरेड्डीवार, दत्तात्रय समर्थ, शिरीष खोब्रागडे, प्रशांत भरतकर, मनोहर शेरकी, महेश चौधरी, ओमदेव मोहुर्ले, अविनाश सुटे, अजय त्रिपत्तीवार उपस्थित होते.