सिंलिडर दरवाढीविरूद्ध राकाँचे जिल्ह्यात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 05:00 AM2021-07-03T05:00:00+5:302021-07-03T05:00:32+5:30

घराघरांत स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढविल्याने सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झालेले आहे. वाढलेले दर कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस, मूलच्या वतीने करण्यात आली. लक्ष वेधण्यासाठी मूल येथील गॅस एजन्सीसमोर निदर्शने करण्यात आली व उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान यांना निवेदन पाठविण्यात आले.

Protests in Rak district against cylinder price hike | सिंलिडर दरवाढीविरूद्ध राकाँचे जिल्ह्यात निदर्शने

सिंलिडर दरवाढीविरूद्ध राकाँचे जिल्ह्यात निदर्शने

Next
ठळक मुद्देकार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी : केंद्र सरकारने सिलिंडर दरवाढ रद्द करण्याची निवेदनाद्वारे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र सरकारच्या सिलिंडर दरवाढीविरूद्ध जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीण काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी चंद्रपूरसह जिल्हाभरात निदर्शने करण्यात आली.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे २५ रूपयांनी सिलिंडर दरवाढ झाली. कोरोनाच्या संकटामुळे जनता आर्थिक अडचणीत मोदी सरकारने हा निर्णय घेतला. ही दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी जटपुरा गेट महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ निदर्शने करताना केली. आंदोलनात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिवाकर गमे, महिला जिहाध्यक्ष बेबी उईके, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, शोभाताई पोटदुखे, हिराचंद बोरकुटे, महादेव पीदूरकर , माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, डी. के. आरिकर, सुनील दहेगावकर, सुनील काळे, प्रियदर्शन इंगळे, पंकज पवार, संजय वैद्य व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

गॅस दरवाढीच्या निषेधार्थ मूल येथे निदर्शने
मूल : घराघरांत स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढविल्याने सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झालेले आहे. वाढलेले दर कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस, मूलच्या वतीने करण्यात आली. लक्ष वेधण्यासाठी मूल येथील गॅस एजन्सीसमोर निदर्शने करण्यात आली व उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान यांना निवेदन पाठविण्यात आले.  आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुमित समर्थ, निपचंद शेरकी, महिला तालुकाध्यक्ष नीता गेडाम, अर्चना चावरे, चांदापूरचे उपसरपंच अशोक मार्गनवार, हेमंत सुपनार, भास्कर खोब्रागडे, प्रभाकर धोटे, गुरुदास गिरडकर, महेश जेंगठे, विनोद आंबटकर, अक्षय पुपरेड्डीवार, दत्तात्रय समर्थ, शिरीष खोब्रागडे, प्रशांत भरतकर, मनोहर शेरकी, महेश चौधरी, ओमदेव मोहुर्ले, अविनाश सुटे, अजय त्रिपत्तीवार सहभागी झाले होते.

भद्रावतीतही दरवाढीविरूद्ध राष्ट्रवादीची निदर्शने

भद्रावती : येथील टप्पा परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निदर्शने करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात रा.कॉं.चे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, उपाध्यक्ष ॲड. युवराज धानोरकर, सुनील महाले, असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष फयाज शेख, महिला शहर अध्यक्ष शबिया देवगडे, महिला अध्यक्ष दुर्ग बिश्वास, युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील लांबट, धनराज विरूटकर, संजय आस्वले, रोहित वाबिटकर, रोहन कुटेमाटे, रवी नागपुरे, पणवेल शेंडे, संदीप चौधरी, रोशन कोमरेड्डीवार, साहील देवगडे सहभागी झाले होते.

 

Web Title: Protests in Rak district against cylinder price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.