२०० युनिट वीज मोफत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:29+5:302021-07-12T04:18:29+5:30
चंद्रपूर : वीज उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे विशेष दर्जा देत येथील नागरिकांना घरगुती वापरातील ...
चंद्रपूर : वीज उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे विशेष दर्जा देत येथील नागरिकांना घरगुती वापरातील २०० युनिट वीज मोफत द्यावी, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडने केली असून या संदर्भातील निवेदन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिले आहे. विशेष म्हणजे, आमदार किशोर जोरगेवार हे यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष असून, त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोनशे युनिट वीज मोफत देण्याचे मतदारांना आश्वासन दिले होते. त्यामुळे या मागणीमुळे आता चंद्रपूरकर नागरिकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
चंद्रपूर जिल्हा वीज उत्पादक जिल्हा आहे. याचे दुष्परिणामही प्रदूषणाच्या माध्यमातून चंद्रपूरकरांना सोसावे लागतात. त्यामुळे याचा मोबदला म्हणून जिल्ह्यातील नागरिकांना घरगुती वापरातील २०० युनिट वीज मोफत देण्यात यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून केली जात आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता यंग चांदा ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत मागणीचे निवेदन दिले. शिष्टमंडळात यंग चांदा ब्रिगेडचे संघटक कलाकार मल्लारप, अमोल शेंडे, करणसिंह बैस, राशीद हुसेन, विश्वजित शाहा, हरमन जोसेफ, जितेश कुळमेथे, अजय दुर्गे, सलीम शेख, दिनेश इंगडे, आनंद इंगडे, रूपेश पांडे, वर्मा, आदींची उपस्थिती होती.