बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:58 PM2018-06-30T22:58:14+5:302018-06-30T22:58:29+5:30
सन २०१७ च्या खरीप हंगामात कापूस पिकावर बोंडअळी व धान पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले़ शेतकरी कर्जबाजारी असून यंदाच्या हंगामाला पैसे नाहीत़ लागवडीकरीता बियाणे व खत खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार खंडारे यांच्याकडे निवेदनातून केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सन २०१७ च्या खरीप हंगामात कापूस पिकावर बोंडअळी व धान पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले़ शेतकरी कर्जबाजारी असून यंदाच्या हंगामाला पैसे नाहीत़ लागवडीकरीता बियाणे व खत खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार खंडारे यांच्याकडे निवेदनातून केली आहे़
चंद्रपूर तालुक्यातील बऱ्याच गावांमधील शेकडो शेतकऱ्यांचे पीक बोंडअळी व तुडतुडे रोगामुळे वाया गेले़ परंतु, मदत मिळाली नाही़ परिणामी, गुरुवारी जि़ प़ चे समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे यांच्या नेतृत्वात तहसीलदार खंडारे, यांची भेट घेवून शासनाच्या १७ मार्च २०१८ च्या निर्णयाची तातडीने अंमबजावणी करावी, अशी मागणी केली़ चंद्रपूर तालुक्यातील ३७९ शेतकऱ्यांच्या १९२.३१ हे.आर. जमिनीवरील धान पिकाचे नुकसान झाले़ नुकसानीकरिता १९ गावांतील बाधित शेतकºयांना १३ लाख ८ हजार रूपये, बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या २ हजार १४८ शेतकऱ्यांना २५९४.७९ रुपये मंजूर करण्यात आले़ २ हजार १४८ कापूस उत्पाद शेतकºयांचे २५९४.७९ हे.आर. क्षेत्रावर नुकसान झाले़ त्यांना १ कोटी ७६ लाख ५२ हजार रूपये मंजूर झाले आहे़ सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे़ शेतीच्या कामांसाठी पैशाची गरज आहे़ पण, निधी अजुनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही़ कापूस व धान उत्पाद शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळाली असती तर खरीप हंगामातील आर्थिक अडचणी दूर झाल्या असत्या़ ही समस्या सोडविण्यासाठी महसूल विभागाकडे संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार चकरा मारल्या़ पण, दखल घेण्यात आली नाही़ परिणामी यंदाचा हंगाम कसा करावा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे़ शेतकºयांची आर्थिक कोंडी लक्षात घेवून रक्कम देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली़ यावेळी जिल्हा परिषदचे समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, नागाळाचे सरपंच शरद रणदिवे पिपरीचे सरपंच पिंपळकर, सुभाष पिंपळशेंडे, रंगराव पवार, अंजय्या गोपेल्लीवार, नरेश एल्कापेल्ली, प्रकाश येल्लरवार, उपसरपंच शेखर खांडारकर व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते़