शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा
By admin | Published: June 30, 2016 01:07 AM2016-06-30T01:07:05+5:302016-06-30T01:07:05+5:30
तालुक्यात दुष्काळाचे सावट मागील तीन वषार्पासून सतत सुरु आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापटला आहे.
कॉग्रेसचे निवदेन : शेतकरी आर्थिक संकटात
मूल : तालुक्यात दुष्काळाचे सावट मागील तीन वषार्पासून सतत सुरु आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापटला आहे. त्यामुळे शेतकऱ्या काढलेल्या पिक विमा त्वरीत देण्यात यावा, अशी मागणी कॉग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली आहे.
मूल तालुक्यातील बहूतेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. तालुक्यामधील दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊनही संपूर्ण तालुक्यात ५० टक्क्यापेक्षा कमी आणेवारी दर्शविलेली आहे. त्यामुळे पिकांची आणेवारी ५० टक्क्यापेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमाची रक्कम त्वरित मिळणे आवश्यक आहे. मात्र २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्याला वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे मूल तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ मिळाला नाही. सदर बाबींचा शासन स्तरावर पाठपुरावा करावा यासाठी मंगळवारी जिल्हा कॉग्रेस कमेटीचे महासचिव संजयपाटील मारकवार यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी निवेदन देण्यात आले
यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सचिव राकेश रत्नावार , उपाध्यक्ष राम बुरांडे, सभापती घनश्याम येनुरकर, उपसभापती संदीप कारमवार, सभापती संगीता पेंदाम, धनंजय चिंतावार, प्रभाकर लेनगुरे, रुमदेव गोहणे, राजेंद्र कन्नमवार, पुरुषोत्तम भूरसे, शांताराम कामडे सरपंच विनोद कामडे आदी कॉग्रेस कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)