शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:33 AM2019-07-14T00:33:24+5:302019-07-14T00:34:54+5:30

गोंडपिपरी तालुक्यातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. निसर्गावर अवलंबून असलेला शेतकरी खरीप हंगाम सुरु होताच बियाणांची जुळवाजुळव करून पेरणी करतो. पण, पीक कर्ज मिळत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी तहसीलदाराला दिलेल्या निवेदनातून केला आहे.

Provide crop loans promptly to the farmers | शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज द्यावे

शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज द्यावे

Next
ठळक मुद्देगोंडपिपरीवासींची मागणी। तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
आक्सापूर : गोंडपिपरी तालुक्यातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. निसर्गावर अवलंबून असलेला शेतकरी खरीप हंगाम सुरु होताच बियाणांची जुळवाजुळव करून पेरणी करतो. पण, पीक कर्ज मिळत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी तहसीलदाराला दिलेल्या निवेदनातून केला आहे.
शेतीच्या हंगाम करण्यासाठी पैशाची अडचण भासते. पीक कर्ज घेण्यासाठी शेतकरी बँकेत पायपीट करीत आहे आतापर्यंत २५ टक्के कर्ज वाटप झाले. ७५ टक्के शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पेट्रोल व डिझेलच्या दरात अधिभार लावल्याने २ रुपये ५० पैसे वाढ झाली. कच्या तेलाच्या किमतीत ६० टक्के घसरण होऊनही सरकारने दर कपात केली नाही, असा आरोप तुकाराम झाडे, कमलेश निमंगडे, गौतम झाडे, बाजार समिती सभापती सुरेश चौधरी, राजू चंदेल, रामा कुरवटकर, ागरसेवक प्रदीप झाडे, देविदास सातपुते, नामदेव सांगडे, बालाजी चनकापुरे, बबलू कुळमेथे, गंगाराम सुरकर आदिंनी केला.

Web Title: Provide crop loans promptly to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.