राजुरा क्रीडा संकुलात अध्यावत सुविधा उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:43 AM2020-12-12T04:43:17+5:302020-12-12T04:43:17+5:30
राजुरा : तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात नुकतीच पार पडली. येथील क्रीडा ...
राजुरा : तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात नुकतीच पार पडली. येथील क्रीडा संकुलात अद्यावत सुविधा पुरविण्याचे निर्देश आमदार सुभाष धोटे यांनी तालुका क्रीडा अधिकाऱ्यांना दिले.
राजुरा तालुका क्रीडा संकुल येथे २०० मी धावपट्टी, इनडोरअर गेम हाॅल, खो-खो, व्हाॅलीबाॅल, कबड्डीचे मैदान, क्रीडा साहित्य, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, सभागृह येथील विद्युतीकरण करणे, क्रीडांगणावरील झुडपे काढून खेळाडूसाठी खेळण्याकरिता परिसर स्वच्छता ठेवणे, बॅडमिंटन हाॅल, लाॅग जंम्पसाठी मैदान तयार करावे, सन २०२०-२१ या सत्राकरिता एक पाहरेकरी व शिपायाची शासनाने निश्चित केलेल्या मानधनावर तत्वावर नेमणूक करावी, असे निर्देश बैठकीत आमदार धोटे यांनी क्रीडा अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी तहसीलदार हरिश गाडे, ठाणेदार नरेंद्र कोसुरकर, क्रीडा अधिकारी राजू वडते, गटशिक्षणाधिकारी संजय हेडाऊ, शिक्षण विभाग रत्नाकर भेंडे, क्रीडा संयोजक राजू डाहुले, वास्तु शिल्प तज्ज्ञ दिनेश नवनारे, अभियंता बाजारे, मिश्रा, योगीता भोयर आदी उपस्थित होते.