प्रत्येक बचतगटांना रोजगार देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:22 AM2019-01-07T00:22:31+5:302019-01-07T00:23:53+5:30

बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती व्हावी, असा आपला मानस आहे. पोंभूर्णा तालुक्यातील प्रत्येक बचत गटांना कोणता ना कोणता रोजगार मिळवून देणार, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

To provide employment to each of the self help groups | प्रत्येक बचतगटांना रोजगार देणार

प्रत्येक बचतगटांना रोजगार देणार

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चांदा ते बांदा योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यात स्वीट क्रांतीची सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती व्हावी, असा आपला मानस आहे. पोंभूर्णा तालुक्यातील प्रत्येक बचत गटांना कोणता ना कोणता रोजगार मिळवून देणार, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
पोंभुर्णा येथे चांदा ते बांदा योजनेतून मधुमक्षिका पालनाच्या प्रशिक्षणाला रविवारी सुरुवात करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पोंभूर्णा या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी टुथपिक व अगरबत्ती उद्योगानंतर आज मधुमक्षिका पालनाच्या प्रशिक्षणाला व पेटी वाटपाला सुरुवात झाली. महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग चंद्रपूर व समर्थ वुमेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील चंद्रपूर जिल्ह्याला कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या संस्थेमार्फत मदत केली जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मधनिर्मितीच्या पारंपारिक पद्धतीला तांत्रिक व आधुनिक जोड दिली जाणार आहे.
यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रानंतर अगरबत्ती निर्माण केंद्र, टूथपिक निर्माण केंद्र, अशा अनेक व्यवसायाची जोड दिली जात आहे. एक हजार आदिवासी महिलांची अंडी उत्पादनाची कंपनी कार्यान्वित झाली आहे.
पोंभूर्णा तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये नजीकच्या काळात आरो मशीन लागणार आहेत.
तालुक्यातील ज्या महिलांना उज्ज्वला गॅस योजनेमध्ये जोडणी मिळाली नसेल, त्यांना वनविभागाच्या माध्यमातून गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पोंभूर्ण्याच्या एमआयडीसीला सुरुवात होत असून या ठिकाणी पर्यावरण पूरक व्यवसाय निर्मिती व्हावी, यासाठी आयआयटी पवईची मदत घेतली जात आहे. ३० नव्या दमाच्या उद्योजकांच्या उद्योगाला चालना दिली जाणार आहे. या एमआयडीसीमधून सोलर पॅनल निर्मितीच्या प्रकल्पालादेखील सुरुवात होईल. प्लॉस्टिक बंदीनंतर बचत गटांच्या माध्यमातून कापडी पिशव्या निर्माण करण्यासाठी २० लाखांची तरतूद जिल्हा नियोजन आराखडयात करण्यात आली आहे.

प्रत्येक गावासाठी एक शेतकरीमित्र
या तालुक्यामध्ये ६१२ विहिरी देण्यात आल्या असून आता प्रत्येक गावांमध्ये पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी बंधारा निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला जाईल. या तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती करता यावी, यासाठी प्रत्येक पाच गावांच्या मागे एक शेतकरीमित्र नियुक्त केल्या जाईल. या शेतकरी मित्राच्या माध्यमातून विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकºयांना दिले जाईल. बचत गटांना नर्सरी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
पोंभुर्ण्याला मध निर्मितीमध्ये आंतरराष्टÑीय ओळख मिळवून द्या
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथे मधुमक्षिका प्रकल्प सुरू होत आहे. या प्रकाल्पाच्या माध्यमातून पोंभूर्ण्याला मध निर्मितीमध्ये आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करून द्या, असे आवाहन यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पोंभुर्णा तालुक्यासाठी उघडले विकासाचे दालन
पोंभूर्णा तालुक्यातील केसरी शिधापत्रिकाधारकांना २ व ३ रुपये दराने धान्य देणार. अशा प्रकारे धान्य देणारा पोंभूर्णा राज्यातील पहिला तालुका.
प्रत्येक गावात आरो मशीन लागणार
उज्ज्वला गॅस योजनेत ज्यांची नावे नाही, ज्यांच्याकडे कनेक्शन नाही, अशा सर्वांना गॅस कनेक्शन मिळवून देत रोजगाराच्या संधीही उपलब्ध करणार
पोंभूर्णातील एमआयडीसी प्रदूषणमुक्त आणि उद्योगयुक्त असणार.
सोलर पॅनलच्या माध्यमातून ५०० महिलांना रोजगार.
मूल व पोंभूर्णा तालुक्यातील प्रत्येक अंगणवाड्या आयएसओ करणार.
वनविभागाच्या नर्सरीतून बचत गटांना कामे देणार.

Web Title: To provide employment to each of the self help groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.