रोजगाराच्या संधी उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:32 AM2021-08-12T04:32:08+5:302021-08-12T04:32:08+5:30
बंद पथदिव्यांमुळे गैरसोय चंद्रपूर : स्थानिक बाबुपेठ, कृष्णनगर, पठाणपुरा वार्डातील काही पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे ...
बंद पथदिव्यांमुळे गैरसोय
चंद्रपूर : स्थानिक बाबुपेठ, कृष्णनगर, पठाणपुरा वार्डातील काही पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पथदिवे सुरू दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पार्किंगअभावी वाहनधारकांची गैरसोय
चंद्रपूर : ताडोबा मार्गावर पार्किगची व्यवस्था नसल्याने वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरील अस्ताव्यस्त वाहतूक सुरू असते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पारंपरिक गाणी लुप्त
चंद्रपूर : ग्रामीण भागात रोवणी गाणी म्हणायची परंपरा होती. परंतु आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. वाजागाजासह शेतातून घरापर्यंत मिरवणूक काढण्याची प्रथा आता कोणत्याच गावात दिसत नाही. खरीपपूर्व हंगामातील कामांना सुरूवात होताच पारंपरिक पुूजाविधी केला जाताे. सध्या रोवणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहे.
अपघात विम्याची जाचक अट
चंद्रपूर : शेतात कामे करताना होणारा अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे यासह रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात व अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. काहींना अपंगत्व येते. यासाठी शासन विम्याद्वारे लाभ देतात. मात्र, जाचक अटीमुळे अनेकांना यापासून वंचित रहावे लागत आहे.