बेरोजगारांना रोजगार द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 06:00 AM2020-01-20T06:00:00+5:302020-01-20T06:00:28+5:30
वरोरा तालुक्यात वर्धा पॉवर प्लांट, जि.एम.आर पॉवर प्लांट, बेलगाव येथील सनफ्लॅग कोळसा खदान, एकोणा कोलमाईन्स आदी कंपन्या कार्यरत आहेत. तालुक्यात नवीन कंपन्या येणार असमुळे येथील बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. स्थानिकांना रोजगार मिळणार असे वाटत असताना या कंपन्यांनी उद्योग नियमांना बगल देत परराज्यातून कामगारांचा भरणा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : तालुक्यातील स्थानिक बेरोजगारांना परिसरातील कंपन्यांमध्ये रोजगार देण्याच्या प्रमुख मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना दिले.
वरोरा तालुक्यात वर्धा पॉवर प्लांट, जि.एम.आर पॉवर प्लांट, बेलगाव येथील सनफ्लॅग कोळसा खदान, एकोणा कोलमाईन्स आदी कंपन्या कार्यरत आहेत. तालुक्यात नवीन कंपन्या येणार असमुळे येथील बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. स्थानिकांना रोजगार मिळणार असे वाटत असताना या कंपन्यांनी उद्योग नियमांना बगल देत परराज्यातून कामगारांचा भरणा केला. परिणामी स्थानिक बेरोजगार रोजगारापासून वंचित आहेत. कंपन्यांनी भूसंपादन करुन अद्यापही केजीपी केली नाही. त्यामुळे भूसंपादित शेतकºयांना व जमीन मालकांना योग्य तो मोबदला मिळाला नाही. शेतकºयांना योग्य मोबदला द्यावा, तसेच स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा, या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना दिले.
निवेदन देणाºया शिष्टमंडळात प्रहार जनशक्ती पक्षाचे वरोरा शहर अध्यक्ष विक्की तवाडे, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर डुकरे, उपतालुका अध्यक्ष पिंटू वासेकर, विद्यार्थी आघाडीचे उपतालुका अध्यक्ष हर्षद ढोके, शेरखान पठाण, निखिल कांबळे, अमोल दातारकर आदी उपस्थित होते.