जळाऊ लाकूड उपलब्ध करून द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:27 AM2021-05-16T04:27:14+5:302021-05-16T04:27:14+5:30
सिंदेवाही : जंगल परिसरात असणारे ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडांचा उपयोग करतात. पण, वनकायद्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. ...
सिंदेवाही : जंगल परिसरात असणारे ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडांचा उपयोग करतात. पण, वनकायद्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. बऱ्याच कुटुंबांकडे सिलिंडर नाही. कोरोनामुळे श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेच्या निधीत कपात करण्यात आली.
सहकारी संस्थांसमोर कर्ज वसुलीचा प्रश्न
वरोरा : सहकारी संस्था बँकांनी कर्ज वितरण केले. मात्र, कोरोनामुळे वसुलीवर अनिष्ट परिणाम झाला. वसुलीच होत नसल्याने सहकारी संस्थांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अनेक संस्था खातेदारांचे विड्राल देण्यासही असमर्थ ठरत आहेत.
रेडियम पट्ट्या लावाव्या
राजुरा : आदिलाबाद मार्गावर अंतर फलक व झाडावर रेडियम पट्ट्या लावण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. राज्य सीमेवरील राज्य सीमा फलक सुस्थितीत करून सीमेचे सौंदर्यीकरण करणे आवश्यक आहे.
मामा तलावावरील अतिक्रमण हटवा
नागभीड : तालुक्यात ५० पेक्षा जास्त मामा तलाव आहेत. मात्र, तलावांच्या संवर्धनासाठी जिल्हा परिषदेकडून तुटपुुंजी तरतूद केली जाते. यातून तलावाच्या विकासाची काम करता येत नाही. अनेकांनी तलावांवर अतिक्रमण केले. हे अतिक्रमण हटविण्यासाठी जि. प. आणि सिंचन विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे.
व्यायाम शाळा उभारण्याची मागणी
कोरपना : तालुक्यातील काही गावात व्यायाम शाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. त्यामुळे व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. कोरपना तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत.
तंटामुक्त समित्यांना आर्थिक बळ द्यावे
नागभीड : महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावातील वातावरण विकासाभिमुख होऊ शकते. मात्र, या समित्यांमध्ये राजकारण शिरायला नको. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावातील तंटामुक्त गाव समित्यांनी चांगले कार्य केले. गृह विभागाने समित्यांना आर्थिक बळ द्यावे.