पूरग्रस्तांना शासनाकडून तत्काळ आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:31 AM2018-07-13T00:31:23+5:302018-07-13T00:32:55+5:30

अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवलेल्या कोरपना व राजुरा या तालुक्यातील गावांना ना. हंसराज अहीर यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.

Provide immediate financial assistance to the flood victims | पूरग्रस्तांना शासनाकडून तत्काळ आर्थिक मदत द्या

पूरग्रस्तांना शासनाकडून तत्काळ आर्थिक मदत द्या

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे निर्देश : राजुरा, कोरपना तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवलेल्या कोरपना व राजुरा या तालुक्यातील गावांना ना. हंसराज अहीर यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. तर पूरग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
कोरपना तालुक्यातील इंजापूर, वडगाव, आसन (खुर्द) व खिरडी तसेच राजुरा तालुक्यातील चंदनवाही व पांढरपौनी या गावांना भेटी देवून पुराची माहिती जाणून घेतली. यावेळी राजुराचे तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, कोरपनाचे तहसीलदार गाडे, तलाठी तसेच अन्य अधिकारी व कोरपना तालुक्याचे भाजप तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, रमेश मालेकर, राजू घरोटे, संजय मुसळे, कवडू जरिले, सतिश उपलंचीवार, रोहन काकडे, सतीश दांडगे, बेसुरवार, पुरूषोत्तम निब्रड, पुरूषोत्तम भोंगळे, हरिभाऊ घोर, सतीश धोटे आदी उपस्थित होते.
जि.प. शाळांची पाहणी
वडगाव व आसन (खु.) या गावातील जि.प. शाळांची दुरवस्था झाली असताना जि.प. प्रशासन या शाळांच्या दुरूस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष करित असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची बाब दोन्ही गावांतील नागरिकांनी ना. अहीर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन दोन्ही शाळांची पाहणी केली. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
 

Web Title: Provide immediate financial assistance to the flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.