बांधकाम कामगारांना साहित्य पुरवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:18 AM2021-07-24T04:18:08+5:302021-07-24T04:18:08+5:30
कापड बाजार अद्यापही मंदीतच चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी प्रत्येक क्षेत्रावर मंदी आली आहे. असे असले तरी कापड ...
कापड बाजार अद्यापही मंदीतच
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी प्रत्येक क्षेत्रावर मंदी आली आहे. असे असले तरी कापड बाजाराला याचा अधिक फटका बसला आहे. आता दुपारी ४ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरु राहते. मात्र पाहिजे त्या प्रमाणात ग्राहक फिरकत नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यातच अजूनही शाळा, महाविद्यालये सुरु झाले नसल्याने कापड खरेदीकडे ग्राहक दुर्लक्ष करीत आहे.
कागदपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ
चंद्रपूर : उशिरा का होईना, पण दहावीचा निकाल लागला आहे. त्यामुळे पुढील प्रवेश प्रक्रियासाठी आता विद्यार्थी कागदपत्र काढण्याच्या तयारीत लागले आहे. त्यामुळे तहसील कार्यालय तसेच सेतू केंद्रामध्ये सध्या विद्यार्थ्यांची गर्दी बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अतिरिक्त खर्च होत आहे.
प्राथमिक शाळा सुरु करण्याची मागणी
चंद्रपूर : मागील दीड वर्षांपासून प्राथमिक शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी आता घरी कंटाळले असून पालकांनाही पाल्यांच्या भविष्याबाबत चिंता सतावत आहे. त्यामुळे शाळा सुरु करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
पहाडावरील बसफेऱ्या अद्यापही बंदच
चंद्रपूर : लाॅकडाऊननंतर आता शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे बसफेऱ्या सुरु झाल्या आहे. मात्र दुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील काही गावात बस सुरू झाली नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.
रोवणीच्या कामाला विद्यार्थ्यांची मदत
चंद्रपूर : सध्या रोवणी हंगाम सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळत नसून अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे. विशेष म्हणजे, शाळा बंद असल्यामुळे मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील विद्यार्थी या कामात गुंतले असून शेतकऱ्यांची मजूर शोधण्याची समस्या काही प्रमाणात सुटली आहे.
शाळा संगणकांवर बसली धूळ
चंद्रपूर : मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहे. त्यामुळे शाळांमध्ये असलेले संगणक तसेच इतर साहित्यावर धूळ बसली असून ते नादुरुस्तही झाले आहे. त्यामुळे याकडे शाळा प्रशासनाने लक्ष देऊन किमान धूळ साफ करण्याची मागणी केली जात आहे.
मध्यवर्ती बँक शाखा सुरु करावी
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये मध्यवर्ती बँकेच्या शाखा नसल्याने शेतकऱ्यांना व्यवहार करण्यासाठी दुसऱ्या गावाला जावे लागते. त्यामुळे वेळ तसेच आर्थिक ताणही सहन करावा लागतो. त्यामुळे मोठ्या गावांमध्ये शाखा सुरु करण्याची मागणी करण्यात आली.
गावातील धार्मिक कार्यक्रमावरही निर्बंध
चंद्रपूर : गावागावात आषाढी, गुरुपौर्णिमा आदी कार्यक्रम दरवर्षी मोठ्या धूमधडाक्यात साजरे होतात. मात्र, कोरोना संकटामुळे या कार्यक्रमांवर निर्बंध आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या शांततेचे वातावरण असून नागरिक घरातच पूजा अर्चना करीत आहे.
पावसामुळे बांधकाम क्षेत्र प्रभावित
चंद्रपूर : मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्र प्रभावित झाले असून मजुरांच्या हाताला काम नाही. जिल्ह्यात मोठ्या संख्येने बांधकाम मजूर आहे. त्यामुळे शासनाने कामगारांना मानधन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.