जिल्हावासीयांना नियमित पाणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:58 AM2019-09-01T00:58:12+5:302019-09-01T00:59:03+5:30
नियोजन भवन येथे शनिवारी आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत मार्च २०१९ अखेर शंभर टक्के म्हणजेच २९९ कोटी रुपये एवढा निधी जिल्ह्याच्या विकासाकरिता खर्च करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरी विभाग असु द्या की ग्रामीण विभाग प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळावे, याकरिता अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आपण शिक्षण आरोग्य पाणी याकरिता विशेष योजना असलेले असून पाणी पुरवठा करण्यात अधिकाऱ्यांनी हयगय करू नये. पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होणार असून त्यादरम्यान जिल्ह्याच्या विकासाची गती कायम ठेवावी, अशा सूचना राज्याचे वित्त, नियोजन, विशेष सहाय्य, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
नियोजन भवन येथे शनिवारी आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत मार्च २०१९ अखेर शंभर टक्के म्हणजेच २९९ कोटी रुपये एवढा निधी जिल्ह्याच्या विकासाकरिता खर्च करण्यात आला. तर २०१९-२० या आर्थिक वषार्साठी जिल्हा वार्षिक योजनेकरिता ३७५ कोटी एवढा निधी मंजूर झाला असून या वर्षात ऑगस्ट अखेर १०४ कोटी निधी खर्च झाला असून खर्चाची एकूण टक्केवारी ४२ टक्के एवढी आहे. या बैठकीमध्ये नाविन्यपूर्ण योजनांना मान्यता देण्यात आली. तसेच चालू वर्षाचे पुनर्नियोजन करण्यात आले.
याप्रसंगी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, खासदार बाळू धानोरकर, खासदार अशोक नेते, आमदार नाना शामकुळे, आमदार अॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूर महानगरपालिकेच्या अध्यक्ष अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते.
या बैठकीमध्ये विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त पदे भरण्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच काही आवश्यक पदे भरायची असून त्याची प्रक्रिया सुरू लवकर सुरू करावी. सोबतच जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला काही यंत्रसामुग्री गरजेची असेल, तर त्यासंदर्भातील मागणी अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.