प्रकल्पग्रस्त शेतमजुरांना काम द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:30 AM2021-02-11T04:30:11+5:302021-02-11T04:30:11+5:30
घुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्रातील कोळसा खाणीसाठी मुंगोली गाव परिसरातील शेती संपादन केल्याने शेतमजुराच्या हाताला काम नाही. बेरोजगार झालेल्या ...
घुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्रातील कोळसा खाणीसाठी मुंगोली गाव परिसरातील शेती संपादन केल्याने शेतमजुराच्या हाताला काम नाही. बेरोजगार झालेल्या शेतमजुरांना त्या क्षेत्रात कार्यरत ट्रान्स्पोर्टर कंपनीत काम देण्याची मागणी संयोजक कोळसा खाण प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे रूपेश ठाकरे यांनी गोदरा प्रायव्हेट कंपनी कोलगाव यांना निवेदन देऊन केली.
वेकोलिच्या वणी क्षेत्रातील मुंगोली कोळसा खाणीकरिता मुंगोली, माथोली, साखरा, जुगाद, कोलगाव, शिवणी, येनक, चिखली, टाकडी गाव परिसरातील शेतीच्या जमिनी भूसंपादन केल्याने शेतीमध्ये शेतमजुरांचे हातचे काम गेले. त्यामुळे ते बेरोजगार झाले. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. वेकोलि वणी क्षेत्रातील कोळसा खाणीत ओबी(माती उचलण्याचे व कोळसा) काढण्याचे काम खासगी ट्रान्सपोर्ट कंपनीना देण्यात आले. त्या कंपनीत वाल्वोसारख्या मोठ्या ट्रकद्वारे कोळसा मातीची वाहतूक होत आहे. बेरोजगार झालेल्या लोकांकडे वाहन चालकाचे परवाने आहे. त्यांना वाल्वो चालविण्याचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी कोळसा खाण प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे संयोजक ॲड. रूपेश ठाकरे यांनी गोदरा प्रायव्हेट कंपनी कोलगाव यांना निवेदन देऊन केली.