शेतकऱ्याचा मुलगा झाला पीएसआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:39 AM2018-12-12T00:39:23+5:302018-12-12T00:40:36+5:30

शेतकरी कुटुंबातील अनेक आई-वडिल अल्प शिक्षित असतात. नातलगातही फारसे उच्च शिक्षित नसतातच. मात्र आई-वडिलांचे आपल्या मुलाला मोठा साहेब बनविण्याचे स्वप्न असते. त्यासाठी ते अपार कष्ट करीत असतात.

PSI is the son of a farmer | शेतकऱ्याचा मुलगा झाला पीएसआय

शेतकऱ्याचा मुलगा झाला पीएसआय

googlenewsNext
ठळक मुद्देजिवतीतील जगदीशचे यश : कठोर परीश्रम व जिद्द हेच यशाचे गमक

शंकर चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : शेतकरी कुटुंबातील अनेक आई-वडिल अल्प शिक्षित असतात. नातलगातही फारसे उच्च शिक्षित नसतातच. मात्र आई-वडिलांचे आपल्या मुलाला मोठा साहेब बनविण्याचे स्वप्न असते. त्यासाठी ते अपार कष्ट करीत असतात. अशाच एका शेतकरी कुटुंबातील मुलाने जिद्द व चिकाटीच्या भरोशावर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करीत दारूबंदी अधिकारी या पदासाठी पात्र ठरला आहे. त्याने प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश हे प्रेरणादायी व देदिप्यमान आहे. ही कहाणी आहे जिवती तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सिमेवरील महाराजगुडा येथील जगदिश उत्तम पवार या युवकाची.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जगदिश पवारचे दहावीपर्यंतचे शिक्षण जिवती तालुक्यातच झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यांने वरोरा येथील आनंदनिकेतन येथे पूर्ण केले. वर्षानुवर्षे पहाडावरील शेतकºयांना दुष्काळी चटके बसत असतानाही आई-वडिलांनी जगदिशला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तयार केले. यावेळी अनेकांनी त्यांना टोमने मारले. मात्र मुलाला घडविण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत साथ दिली. या संधीचे सोने करण्यासाठी ‘मी नक्कीच अधिकारी बनेल’ असे स्वप्न जगदिशने मनात बाळगून पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
दरम्यान २०११ मध्ये झालेल्या पीएसआय परीक्षेत त्याची काही मार्काने अंतिम निवड हुकली. त्यानंतर सन २०१३ मध्येही यशाने हुलकावणी दिली. पुढे तीन वर्ष सतत अपयश आल्यानंतरही जगदिशने हार मानली नाही. आपल्या प्रतिकूल परिस्थितीची जाणिव ठेवून तेवढ्याच जिद्दीने पुन्हा दिवसरात्र अभ्यास केला. आणि सन २०१७ मध्ये झालेल्या दारूबंदी पीएसआय पदाच्या परीक्षेत यश मिळवत अखेर आपल्या व आपल्या आईवडिलांच्या कष्टाचे चिज करीत पीएसआय पदासाठी पात्र ठरला.
पहाडावर शिक्षणाचा अभाव असतानाही खेड्यातला मुलगा एमपीएससी उत्तीर्ण करुन पीएसआय पदासाठी पात्र होतो. हा अभिमान जगदिश पवारच्या आई- वडिलांच्या चेहºयावर दिसून येत आहे. आपण संपूर्ण आयुष्यात तारेवरची कसरत सोसली. परंतु, मुलाला त्याच्या ध्येयापासून कधिच विचलीत होऊ दिले नाही. याची जाणीव ठेवत जगदिशने आपल्या आई-वडिलांचे व स्वत:चे स्वप्न पूर्ण केले. जगदिशचा आदर्शचा घेत जिद्दीने प्रयत्न करीत तालुक्यातील युवकांनी अधिकारी बनावे, असा विश्वास पवार कुटुंबीयांनी लोकमतजवळ व्यक्त केला.

Web Title: PSI is the son of a farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस