पु. ल. देशपांडे यांच्यावरील ‘भाई’ चित्रपटाचे चित्रीकरण आनंदवनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 09:58 PM2018-11-24T21:58:47+5:302018-11-24T21:59:03+5:30
मराठी रसिकांच्या मनावर कायमचा ताबा मिळविणारे पु. ल. देशपांडे व आनंदवन यांचे अतुट संबंध अखेरच्या श्वासापर्यंत राहिले. पु. ल. देशपांडे यांच्यावरील ‘भाई व्यक्ती की वल्ली’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करण्याकरिता प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर आपल्या चमूसह आनंदवनात दाखल झाले होते. चित्रपट ४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : मराठी रसिकांच्या मनावर कायमचा ताबा मिळविणारे पु. ल. देशपांडे व आनंदवन यांचे अतुट संबंध अखेरच्या श्वासापर्यंत राहिले. पु. ल. देशपांडे यांच्यावरील ‘भाई व्यक्ती की वल्ली’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करण्याकरिता प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर आपल्या चमूसह आनंदवनात दाखल झाले होते. चित्रपट ४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
भाईच्या आयुष्यभराच्या गोष्टी चित्रपटातून नाकारल्या जाणार असून भाई एक माणूस म्हणून कसे होते, त्यांनी आयुष्यात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पं. भिमसेन जोशी, कर्मयोगी बाबा आमटेंसारखी मानसे जोडली. आनंदवनात पु. ल. देशपांडे नियमित मित्र मेळावा घेत. आनंदवनातील कुष्ठरोगी, मूक-बधीर आदींना नाटक बघावयास मिळावे म्हणून आनंदवनातील मुक्तांगण हे व्यासपीठ तयार करून त्यावर प्रसिद्ध नाटके पु.ल. देशपांडे हे आणत. आनंदवनवासियांना बघावयास मिळत होती. पु. ल. देशपांडे यांचे आनंदवनातील नाते अतुट होते. त्यामुळे पु. ल. देशपांडे आनंदवनात येणार असल्याची माहिती आनंदवनवासीयांना मिळताच त्यांचा आनंद ओसंडून वाहत असे. आनंदवनातील दिव्यांगांच्या विवाह सोहळ्यातील मंगलाष्टके भाई स्वत: म्हणत होते. भाई आणि कर्मयोगी बाबांच्या ऋुणानूबंधाचा उलगडा या चित्रपटातून होणार आहे. सागर देशमुख-पु.ल. देशपांडे, इरावती हर्षे-सुनीताबाई, मेघा मांजरेकर-साधनाताई तर संजय खापरे-बाबांची भूमिका साकारणार आहे. उदास व गंभीर चेहऱ्यावर हास्याची लकीर उमटविणारे पु.ल. देशपांडे यांच्या साहित्यकृतीवर चित्रपट झाले. परंतु, पु.ल. देशपांडेवर चित्रपट १७ वर्षानंतर येताहेत अशा भावना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त करीत ‘भाई व्यक्ती की वल्ली’ हा मराठी चित्रपट नक्कीच आवडेल असा आशावाद व्यक्त केला. कर्मयोगी बाबा आमटे यांचे कार्य अफाट आहे, त्यामुळे त्यावर बायोपीक करण्याचा मानस याप्रसंगी महेश मांजरेकर यांनी व्यक्त केला.