मधुमेह आजाराबाबत होणार जनजागृती
By admin | Published: October 29, 2016 12:46 AM2016-10-29T00:46:26+5:302016-10-29T00:46:26+5:30
आयुष मंत्रालय भारत सरकार यांनी यावर्षीपासून धन्यंतरी जयंती ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.
जिल्हा परिषदेत कार्यक्रम : प्रथम ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’
चंद्रपूर : आयुष मंत्रालय भारत सरकार यांनी यावर्षीपासून धन्यंतरी जयंती ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. यावर्षी शुक्रवार २८ आॅक्टोंबरला प्रथम ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हा परिषद चंद्रपूर व जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थामध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
‘आयुर्वेदाद्वारे मधुमेहाचे प्रतिबंधन व नियंत्रण’ असा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस प्रबोधनाचा विषय होता. २४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा होत आहे. यानिमित्त सर्व आरोग्य संस्थामध्ये २८ आॅक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत मधुमेह जनजागृती अभियान आयोजित केला जाणार आहे. या अभियानात शासनाचे आयुष विभाग, असांसर्गिक रोग (एन.डी.डी.) विभाग यासह विमलादेवी आयुर्वेद महाविद्यालय वांढरी, खाजगी आयुर्वेद व्यावसायिक, आयुर्वेद व्यासपीठ, निमा संघटना यांचाही सहभाग राहणार आहे.
नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुणालय येथील आयुष विभाग, शासकीय दवाखाने येथून आयुर्वेद चिकित्सा प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)