पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी केली जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 11:50 PM2017-08-26T23:50:53+5:302017-08-26T23:51:14+5:30
स्थानिक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘भारत की बेटी और जवान’ हे पथनाट्य शहरातील मुख्य मार्गावर सादर करुन जनजागृती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्थानिक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘भारत की बेटी और जवान’ हे पथनाट्य शहरातील मुख्य मार्गावर सादर करुन जनजागृती केली.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थेच्या पदाधिकारी व शिक्षकासमोर पथनाट्य सादर केले. त्यानंतर चंद्रपूर शहरातील पोलीस मैदानावर, अंचलेश्वर गेट व बंगाली कॅम्प येथे आपल्या पथनाट्याचे सादरीकरण केले.
सदर पथनाट्यातून भारतातील मुलींवर होत असलेले अत्याचार, त्यांना समाजात प्रत्येक गोष्टीसाठी करावी लागणारी तडजोड, त्याच्यावरील अन्याय, भारतीय सैन्य दलातील सैनिक त्यांच्या जीवनातील क्षण या संपूर्ण आशयावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. सदर पथनाट्य महाविद्यालयाचा विद्यार्थी कामेश गाडगे यांनी लिहिले होते. तर महाविद्यालयाचे वैभव पवार, संदेश सिद्धेवार, तृप्ती मालेकर, हनुमान धावडे, साक्षी सबनीस, रश्मी कापगाते, कोमल निंबाळकर, वैष्णवी चरडे, मयुरी घोगले, निकिता गाडगे, योगेश येरमे, पायाल खोब्रागडे, नितीन गायकवाड, योगेश चव्हाण व गणेश मगर यांचा सहभाग होता.