सार्वजनिक गणेश मंडळांनी लोकोपयोगी उपक्रम राबवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:34 AM2021-09-16T04:34:42+5:302021-09-16T04:34:42+5:30
चंद्रपूर : करोना संक्रमण काळात सामाजिक बांधीलकी जोपासत श्रीकृष्ण गणेश मंडळाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले. या शिबिराचा लाभ ...
चंद्रपूर : करोना संक्रमण काळात सामाजिक बांधीलकी जोपासत श्रीकृष्ण गणेश मंडळाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले. या शिबिराचा लाभ तीनशेपेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला. सार्वजनिक गणेश मंडळांनी अशा प्रकारचे लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधीलकी जोपासावी, असे मत खासदार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांनी व्यक्त केले.
साईबाबा वार्ड, सिव्हील लाईन येथील श्रीकृष्ण गणेश मंडळाच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेविका तथा माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया, श्रीकृष्ण गणेश मंडळाचे अध्यक्ष वीरेंद्र लोढीया, प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रेय, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. विनोद गोरंटीवार, सचिव महेंद्र खाडे, शहर काँग्रेस महासचिव अजय बलकी, कोषाध्यक्ष नितीन गायधने, सहकोषाध्यक्ष हरीश भुंबर उपस्थित होते.
याप्रसंगी नगरसेविका सुनीता लोढिया यांनी आरोग्य शिबिरासोबतच गणेश मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. आरोग्य शिबिरात अस्थी रोग तज्ज्ञ डॉ. चेतन नागरेचा, बालरोग तज्ज्ञ डॉ. राम भारत, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आसावरी देवतळे, डॉ. मनीषा वासाडे, योग निसर्गोपचार व पंचगव्य चिकित्सक डॉ. सीमा वनकर, डॉ. भूपेंद्र लोढिया, डॉ. सुधीर मत्ते, डॉ. सिराज खान, डॉ. पंकज लोनगाडगे, डॉ. अश्विनी भारत यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली.
शिबिरात सहभागी प्रत्येकाला मोफत औषधीचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाला महापालिकेच्या झोन अधिकारी अश्विनी येडे यांनीही सहकार्य केले. कार्यक्रमासाठी मकरंद खाडे, सुनील खोकले, महेश बदखल, विवेक बानकर, सुधीर पोडे, सागर कांत, संदीप पाचभाई, जितेंद्र शेंडे, अजय बलकी, शैलेश निखोडे, समीर दाचेवार, हिमानी लोढिया, दिलीप दुधलकर, बसोराज हिरमेठ, मिलिंद उमाटे, आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.