सार्वजनिक आरोग्यासाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:02 AM2017-09-12T00:02:11+5:302017-09-12T00:02:27+5:30

सार्वजनिक आरोग्य हा शासनाच्या प्राधरन्यक्रमावरचा विषय असून तो सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित असलेला विषय आहे.

Public health will not let the funds fall short | सार्वजनिक आरोग्यासाठी निधी कमी पडू देणार नाही

सार्वजनिक आरोग्यासाठी निधी कमी पडू देणार नाही

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : मुंबईत पार पडली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सार्वजनिक आरोग्य हा शासनाच्या प्राधरन्यक्रमावरचा विषय असून तो सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित असलेला विषय आहे. जनसामान्यांच्या आयुष्यातील या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी, औषधी खरेदी करण्यासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी.के बालपांडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचाही आढावा घेतला. या महाविद्यालयातील रिक्त तसेच भरलेल्या जागा, इमारतींचे बांधकाम, यंत्रसामग्रीची खरेदी याचा यात समावेश होता. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे काम ठराविक कालमर्यादा निश्चित करून पूर्ण करावे, अशा सूचना देताना ते म्हणाले, कामांसाठी देण्यात येणाºया तांत्रिक तसेच प्रशासकीय मान्यता या वेळेत दिल्या जाव्यात, असे सांगितले.

Web Title: Public health will not let the funds fall short

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.