घुग्घुस लायडच्या विस्तारीकरणासाठी आज जनसुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:18 AM2021-06-30T04:18:57+5:302021-06-30T04:18:57+5:30

७६० कोटींच्या नवीन प्रस्तावित प्रकल्पासंदर्भात होणाऱ्या या जनसुनावणीबाबत अतिशय गुप्तता बाळगण्यात येत आहे. सुनावणी कुठे व केव्हा होणार ...

Public hearing today for the expansion of Ghughhus Lloyd | घुग्घुस लायडच्या विस्तारीकरणासाठी आज जनसुनावणी

घुग्घुस लायडच्या विस्तारीकरणासाठी आज जनसुनावणी

Next

७६० कोटींच्या नवीन प्रस्तावित प्रकल्पासंदर्भात होणाऱ्या या जनसुनावणीबाबत अतिशय गुप्तता बाळगण्यात येत आहे. सुनावणी कुठे व केव्हा होणार याबाबत परिसरातील ग्रामपंचायती वा घुग्घुस नगर परिषद प्रशासनालाही याची सूचना दिली नसल्याची बाब पुढे आले आहे. असे असताना काही स्थानिक नेत्यांचे व्यवस्थापनाला आतून सहकार्य असल्याचे बोलले जात आहे.

लायड मेटल्स ॲन्ड एनर्जी लि. या कारखान्याचा स्पांज आर्यनचा ५०० क्षमतेचा असलेला एक, तर १०० क्षमतेचे चार युनिट सुरू आहेत. त्यापासून ३ लाख २४ हजार टीपीए इतकी उत्पादन क्षमता आहे, तसेच कोलवाॅशरीज, २५ एम. एस. कारखान्यातून वीजनिर्मिती होत आहे. त्यापासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. मुलेही आजार घेऊन जन्माला येत आहेत. विविध आजार लोकांना जडले आहेत. शेतजमिनीचा पोत खराब होत आहे. परिणामी उत्पन्न घटले आहे. या संदर्भात शेतकऱ्यांसह समाजसेवी संस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह शासनस्तरावर अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, कोणतेही प्रदूषण कमी झाले नसताना विस्तारीकरण होऊ घातले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Public hearing today for the expansion of Ghughhus Lloyd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.