विविध विषयांवर गाजली बल्लारपूर पालिकेची आमसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:34 AM2021-09-10T04:34:50+5:302021-09-10T04:34:50+5:30
यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी ही शेवटची सभा असल्याचे सांगितले व विकास कामाच्या ३० ...
यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी ही शेवटची सभा असल्याचे सांगितले व विकास कामाच्या ३० प्रस्तावावर गरमागरम चर्चा केली. शेवटची सभा असल्यामुळे काही नगरसेवकांचा अपवाद सोडला तर अनेक नगरसेवक व नगरसेविका यांची या सभेत उपस्थिती होती. २०१९-२० या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा कमी-जास्त झालेल्या खर्चाला व उत्पन्नाला मंजुरी देताना आकड्यांच्या तफावतीची चर्चा झाली. त्यानंतर तेलगू शाळेची पटसंख्या घसरल्यामुळे दुसऱ्या शाळेत विलगीकरणाचा मुद्दा ठेवण्यात आला. प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पद भरण्यावर चर्चा करण्यात आली. पाच वर्षाकरिता मालमत्ता कराचे फेरमूल्यांकन करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला. तसेच सफाई कामगारांच्या आवश्यक प्रश्नांवर, वाल्मिकी, मेहतर समाजाला सामाजिक, आर्थिक संरक्षण देण्यासाठी सफाई कामगारांच्या नियुक्तीबाबत लाड समितीने शिफारस केलेली वारसा पद्धत पुढे चालू ठेवण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
090921\20210909_162438.jpg
नप ची इमारत