सार्वजनिक शौचालये पाण्याअभावी वापराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:27 PM2018-01-31T23:27:53+5:302018-01-31T23:28:44+5:30

देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी सांगत होते.

Public toilets without use of water | सार्वजनिक शौचालये पाण्याअभावी वापराविना

सार्वजनिक शौचालये पाण्याअभावी वापराविना

Next
ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन कागदावरच : प्रशासनाचा दावा फोल

आॅनलाईन लोकमत
सिंदेवाही : देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी सांगत होते. त्यामुळे खेडे व शहरे स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविणे जात आहे. शासनाने गावागावात सार्वजनिक शौचालये ेबांधली. मात्र पाण्याअभावी ही शौचालये वापराविना असल्याचे वास्तव सिंदेवाही तालुक्याचे आहे.
शासनाने २००३ पासून निर्मलग्राम योजना राबवून स्वच्छतेचे महत्त्व विषद केले. त्यावेळी निर्मलग्राम योजनेला लोकसहभाग पाहण्यासारखा होता. गावांनी स्वयंस्फूर्तीने निर्मलग्राम चळवळीत सहभाग नोंदवून पुरस्कार मिळविण्यासाठी स्पर्धाच केली होती. २००३ मध्ये तालुक्यातील बºयाच ग्रामपंचायती निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मानित झाल्या. पुढे ही योजना बदलून स्वच्छता अभियानासाठी बºयाच योजना आल्या. सद्यस्थितीत स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू आहे. पण या योजनेत लोकसहभाग नाममात्रच आहे. पाण्याचा अभाव यामुळे सार्वजनिक शौचालये नावाचीच ठरली असल्याचे दिसून येते.
दारे, टाईल्स चोरीला; सभोवताल कचऱ्याचे साम्राज्य
भुरट्या चोरट्यांनी अनेक शौचालयाची दारेच चोरून नेली आहेत. तर काही ठिकाणची सार्वजनिक शौचालये पाण्याअभावी अस्वच्छ आहेत. शौचालयाच्या भिंतीवर लावलेल्या टाईल्स् गायब झाल्या असून शौचालयाच्या सभोवताल कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे शौचालयाचा वापर करण्यास समाजमन तयार नाही. शौचालयाच्या वापरासाठी पाणी घरून नेण्यासाठी गावकरी तयार नाही. त्यामुळे शासनाचा खर्च व्यर्थ जात आहे.

Web Title: Public toilets without use of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.