‘मोरगाड’ या झाडीकाव्यसंग्रहाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:33 AM2021-09-07T04:33:53+5:302021-09-07T04:33:53+5:30
चंद्रपूर : झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर, जिल्हा ग्रामीण विभागाच्या वतीने मूल येथे कवी लक्ष्मण खोब्रागडे यांच्या मोरगाड काव्यसंग्रहाचे ...
चंद्रपूर : झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर, जिल्हा ग्रामीण विभागाच्या वतीने मूल येथे कवी लक्ष्मण खोब्रागडे यांच्या मोरगाड काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. मूल पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर यांनी केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अध्यासनाचे प्रमुख गुरूप्रसाद पाखमोडे, भाष्यकार म्हणून अरुण झगडकर, चंद्रकांत लेनगुरे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून पं.स. चे सभापती चंदू मार्गोनवार, संवर्ग विकास अधिकारी मयूर कळसे ,गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुनील शेरकी, गंगाधर कुनघाडकर, गडचिरोली ‘अंनिस’चे
विलास निंबोरकर, विजय भोगेक, शशिकला गावतुरे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक लक्ष्मण खोब्रागडे यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने जिल्हा झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षकांना झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार देऊन गौरवविण्यात आले. संचालन नागेंद्र नेवारे आणि वीरेनकुमार खोब्रागडे यांनी केले, तर आभार परमानंद जेंगठे यांनी मानले.