पुणे-काजीपेठ एक्स्प्रेस २० आॅक्टोंबरपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:38 AM2017-10-19T00:38:06+5:302017-10-19T00:38:17+5:30
चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांची पुणे गाडीची बहुप्रतिक्षीत मागणी अखेर पूर्ण झाली असून ही गाडी येत्या २० आॅक्टोंबरपासून सुरू होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांची पुणे गाडीची बहुप्रतिक्षीत मागणी अखेर पूर्ण झाली असून ही गाडी येत्या २० आॅक्टोंबरपासून सुरू होत आहे. २१ आॅक्टोंबर रोजी दुपारी १.३० वाजता चंद्रपूर रेल्वे स्थानकावर येणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पुणे गाडीविषयी जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला असून ही जिल्हावासीयांसाठी दिवाळीची अनमोल भेट ठरली आहे.
ना. हंसराज अहीर यांनी पुणे-काजीपेठ क्र. २२१५१ व काजीपेठ-पुणे क्र. २२१५२ ही साप्ताहिक एक्सप्रेस दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांची पूर्तता झाली आहे. गेल्या कित्येक जनतेने बघितलेले स्वप्न आता प्रत्यक्षात साकारले आहे. चंद्रपूर येथून पुण्याकरिता थेट रेल्वे गाडी नसल्याने या जिल्हयातील व्यवसायी, उद्योजक, नोकरदार, विद्यार्थी व नागरिकांना प्रचंड असुविधा होत होती. गेल्या काही वर्षांपासून पुणे गाडी सुरू करण्याचा आग्रह रेल्वे सुविधा संघटनांच्या माध्यमातून ना. हंसराज अहीर यांच्याकडे धरण्यात येत होता. विद्यार्थ्यांकडून ही मागणी वारंवार केली जात होती. ना. हंसराज अहीर यांनी चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्हयातील लोकांच्या अडचणींची दखल घेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करून अखेर ही गाडी सुरू करवून घेतली. या नव्या साप्ताहिक पुणे गाडीमुळे जिल्हयामध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले आहे.
२२१५१ क्रमांकाची पुणे-काजीपेठ एक्सप्रेस शुक्रवारी ९.४५ वाजता पुण्याहून सुटणार असून ही गाडी पुढील रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. ज्यात दांैड (११ वाजता), अहमदनगर, कोपरगांव (शिर्डी), मनमाड, भुसावळ, शेगांव, अकोला, बडनेरा (१०.२२), धामनगाव, पुलगांव, वर्धा, वरोरा, चंद्रपूर (१.३७), बल्लारशाह (२.२५), शिरपूर, कागजनगर, रामागुंडम, पेदापल्लीनंतर काजीपेठला शनिवारी ६.३५ वाजता पोहचेल. २२१५२ क्रमांकाची काजीपेठ-पुणे एक्सप्रेस काजीपेठ येथून रविवारी १.३५ वाजता सुटेल. बल्लारशाहला ५.२५, चंद्रपूरला ५.५७, बडनेराला ९.५५, दौंडला ९.३०, पुणेला सोमवारी ११.०५ वाजता पोहचेल. पुणे-काजीपेठ या नव्या साप्ताहिक गाडीमुळे गोरगरीब प्रवाशांबरोबरच जिल्हयातील नोकरदार व पुण्यात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची फार मोठी सोय झाली आहे.