पुणे-काजीपेठ रेल्वेला मिळाला थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 10:02 PM2019-03-10T22:02:58+5:302019-03-10T22:03:11+5:30

भद्रावती शहराचे ऐतिहासिक महत्त्व आहे. पर्यटकांची गैरसोय लक्षात घेऊन भांदक रेल्वे स्थानकावर पुणे - काजीपेठ एक्सप्रेसचा थांबा मंजूर करण्यात आला आहे. शनिवारी सदर गाडीचे दुपारी १२ वाजून ५४ मिनिटांनी भद्रावती रेल्वेस्थानकावर आगमन झाले. त्यावेळी शहरवासीयांनी उत्साहात स्वागत केले.

Pune-Kazipet Railway get the wait | पुणे-काजीपेठ रेल्वेला मिळाला थांबा

पुणे-काजीपेठ रेल्वेला मिळाला थांबा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवाशांमध्ये आनंद : उद्योगाला मिळणार चालना

लोकमत न्यूज नेटवर्क
आयुधनिर्माणी (भद्रावती) : भद्रावती शहराचे ऐतिहासिक महत्त्व आहे. पर्यटकांची गैरसोय लक्षात घेऊन भांदक रेल्वे स्थानकावर पुणे - काजीपेठ एक्सप्रेसचा थांबा मंजूर करण्यात आला आहे. शनिवारी सदर गाडीचे दुपारी १२ वाजून ५४ मिनिटांनी भद्रावती रेल्वेस्थानकावर आगमन झाले. त्यावेळी शहरवासीयांनी उत्साहात स्वागत केले.
ही एक्स्प्रेस शनिवारला दुपारी १२.५४ वाजता काजीपेठकडे जाते. काजीपेठ येथून पुण्याकडे जाताना भद्रावती स्टेशनला सायंकाळी ६.१५ वाजता थांबा देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने भांदकला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले. या शहरात हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान वरदविनायक, भद्र नागमंदिर ,जैन धर्मियांचे पार्श्वनाथ आणि बौध्द धर्मिय्यांची विजासन लेणी प्रसिद्ध आहे. भद्रावती येथे संरक्षण मंत्रालयाचा दारूगोळा कारखाना, वेकोलि कोळसा खाण, एनटीपीसी प्रकल्प असे अनेक उद्योग असल्याने देशाच्या विविध भागातून प्रवाशांची ये-जा सुरू असते. या क्षेत्रातील शेकडो विद्यार्थी व नागरिक शिक्षणासोबतच व्यवसाय करण्यासाठी पुणे येथे निवास करतात. त्यामुळे ही गाडी आता भद्रावती स्थानकावर थांबविणे आश्यक होते. स्वागताप्रसंगी सुनील नामोजवार, प्रशांत डाखरे, किशोर गोवारदिपे, प्रवीण सातपुते, अफजलभाई, इम्रान खान, विनोद देठे, पंढरी पिंपळकर, जयश्री दातारकर, संदीप पाचभाई, मधुकर सावनकर आदी उपस्थित होते.

Web Title: Pune-Kazipet Railway get the wait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.