बॉस्केटबॉल स्पर्धेत पुणे, नागपूर, ब्रह्मपुरीच्या संघाचे वर्चस्व
By admin | Published: January 19, 2017 12:50 AM2017-01-19T00:50:54+5:302017-01-19T00:50:54+5:30
संमित्र क्रीडा मंडळ व चंद्रपूर जिल्हा बॉस्केटबॉल असोशिएशनच्या वतीने ब्रह्मपुरीत १४ ते १७ जानेवारीपर्यंत चाललेल्या ...
राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप : मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण
ब्रह्मपुरी : संमित्र क्रीडा मंडळ व चंद्रपूर जिल्हा बॉस्केटबॉल असोशिएशनच्या वतीने ब्रह्मपुरीत १४ ते १७ जानेवारीपर्यंत चाललेल्या राज्यस्तरीय बॉस्केटबॉल स्पर्धेत पुणे, नागपूर व ब्रह्मपुरी संघाने बाजी मारली. बुधवारी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
अंतिम सामन्यात पुरुष गटात बी.ई.जी. पुणे संघ तर महिला गटात डी.एम.के. नागपूर संघ विजेता ठरला. बाल गटात संमित्र क्रीडा मंडळ ब्रह्मपुरीने विजेतपद पटकाविले. पुरूष गटात द्वितीय पुरस्कार बिड संघ, तृतीय पुरस्कार कर्नाटक संघ विजेता ठरला. चर्तुथ पुरस्कार शिवाजी नगर जिमखाना नागपूरने पटकाविला. महिला गटात द्वितीय पुरस्कार एस. के. एस. नागपूर, तृतीय पुरस्कार अमरावतीच्या संघाने पटकाविला. बाल गटात द्वितीय पुरस्कार हनुमान व्यायाम शाळा अमरावती, तृतीय पुरस्कार सोलापूर जिल्हा संघाने पटकाविला.
स्पर्धेत बेस्ट प्लेअरचा पुरस्कार रसिका पांडे अमरावती, बेस्ट शुटर मैथीली पानतावणे नागपूर (महिला गट), पुरुष गटात बेस्ट प्लेअर अक्षय कराड बीड, बेस्ट शुटर चेतन सुरेश कर्नाटक व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू सौरभ कालवा पुणे याने पटकाविला. बाल गटात बेस्ट प्लेअर सौरभ कुंभारे, कोल्हापूर, बेस्ट शुटर मनिष राऊत अमरावती व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू कृषभ राऊत ब्रह्मपुरी याने पटकाविला. समारोपीय कार्यक्रमाला माजी आमदार प्रा. अतुल देशकर, डीवायएसपी प्रशांत परदेसी, डॉ. अतुल नागरे, प्रा. देविदास जगनाडे, प्रायोजक, आयोजक व इतर पाहुण्यांच्या हस्ते रोख व चषक देऊन खेळाडू व संघांचा सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)