विना मास्क फिरणाऱ्या १३३ जणांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:00:51+5:30
संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमाणात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : लॉकडाऊन शिथिल केले असले तरी विना मास्क बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहे. तरीही अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहे. सावली येथे नव्यानेच रुजू झालेले तहसीलदार परीक्षित पाटील, संवर्ग विकास अधिकारी अमोल भोसले, नायब तहसीलदार सागर कांबळे यांनी आपल्या चमूसह तालुक्यातील विविध ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावात स्वत: रस्त्यावरुर उतरुन विना मास्क फिरणाऱ्या १३३ जणांंवर कारवाई केली. त्यांच्याकडून २६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला.
संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमाणात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. ही बाब लक्षात घेता तहसीलदार तहसीलदार पाटील, गटविकास अधिकारी भोसले आपल्या चमूसह चकपिरंजी, हिरापूर, व्याहाड, व्याहाड खुर्द, मोखारा, चिचबोडी, पाथरी आदी ठिकाणी विना मास्क घालून फिरणाऱ्या १३३ जणांकडून प्रत्येकी २०० रुपये याप्रमाणे २६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. यावेळी विविध ग्रामपंचयातचे सरपंच, पदाधिकारी, तंमुस पदाधिकारी उपस्थित होते.
सिंदेवाहीत ७९ जणांवर दंड
शहरात विना मास्क फिरणाऱ्याविरुद्ध नगर पंचायत मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी विशेष मोहीम राबवून सुमारे ७९ जणांवर प्रत्येकी २०० रुपयेप्रमाणे १५ हजार ८०० रुपयांचा दंड आकारला. सिंदेवाहीलगच्या ब्रह्मपुरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा प्रभाव तालुक्यात पडू नये यासाठी सतर्कता बाळण्याच्या अनुषंगाने शहरात फिरुन कारवाई करण्यात आली. यापूर्वीसुद्धा ४५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कार्यालयीन अधीक्षक पंकज आसेकर, सुधीर ठाकरे, विनोद काटकर, संतोष घडसे, पुरुषोत्तम खोब्रागडे, राजेंद्र नन्नावरे, संजय रामटेके, अमोल पाटील, बोंडगुलवार, मारभते आदींनी या कारवाया केल्या.