शासकीय कर्मचाऱ्यांचा पहिल्या दिवशी हेल्मेट सक्तीला 'खो'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 12:22 PM2022-02-02T12:22:17+5:302022-02-02T12:30:47+5:30

चंद्रपुरात तीन टप्प्यांत हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १४ पोलिसांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्पा १ फेब्रुवारीपासून शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध राबविण्यात आला. यात १४५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

punitive action against 145 non helmet rider government employees by chandrapur traffic police | शासकीय कर्मचाऱ्यांचा पहिल्या दिवशी हेल्मेट सक्तीला 'खो'

शासकीय कर्मचाऱ्यांचा पहिल्या दिवशी हेल्मेट सक्तीला 'खो'

Next
ठळक मुद्देवाहतूक शाखेतर्फे हेल्मेट सक्तीची मोहीम पहिल्याच दिवशी १४५ जणांवर कारवाई

चंद्रपूर : वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जिल्ह्यात हेल्मेट सक्ती सुरू केली. शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध राबविलेल्या या मोहिमेत तब्बल १४५ शासकीय कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

दुचाकी वाहनचालकांच्या अपघातामध्ये विना हेल्मेट मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी चंद्रपुरात तीन टप्प्यांत हेल्मेटसक्ती केली आहे. पहिल्या टप्प्यात पोलीस कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात शासकीय कर्मचारी आणि तिसऱ्या टप्प्यापासून सर्वसाधारण नागरिकांवर कारवाई करण्यात येण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. पहिल्या टप्प्यात १४ पोलिसांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्पा १ फेब्रुवारीपासून शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध राबविण्यात आला. पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कारवाई करण्यात आली. यात १४५ शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करुन प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तीन टप्प्यांत जिल्ह्यात हेल्मेटसक्ती राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात १४ पोलीस कर्मचारी तर दुसऱ्या टप्प्यात १४५ शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आता लवकरच सर्वसाधारण व्यक्तींसुद्धा विनाहेल्मेट आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनीच हेल्मेटचा वापर करावा.

-प्रवीणकुमार पाटील, वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर

Web Title: punitive action against 145 non helmet rider government employees by chandrapur traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.