नऊ सोसायटयांकडून २४ हजार क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 05:00 AM2020-12-21T05:00:00+5:302020-12-21T05:00:47+5:30

नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकºयांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात असा आजवरचा अनुभव आहे. आदिवासी विकास महामंडळाकडून शासनाने मागील वर्षीप्रमाणेच तालुक्यातील नऊ आदिवासी सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. प्रत्यक्षात ही धान खरेदी ३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे.आदिवासी विकास महामंडळाचे  हमीभाव १८८८ व १८३५ रुपये आहेत. धान विक्रीवर बोनसही दिला जातो.

Purchase of 24,000 quintals of paddy from nine societies | नऊ सोसायटयांकडून २४ हजार क्विंटल धान खरेदी

नऊ सोसायटयांकडून २४ हजार क्विंटल धान खरेदी

Next
ठळक मुद्देसोसायटयांचीही धान खरेदी जोरात

  घनश्याम नवघडे
    लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : आदिवासी सोसायट्यांमध्येही धानास योग्य भाव मिळत असल्याने सोसायटयांचीही धान खरेदी जोरात सुरू आहे. नागभीड तालुक्यात नऊ आदिवासी सोसाट्यांमार्फत धान खरेदी सुरू आहे. १९ डिसेंबरच्या आकडेवारीनुसार नऊ सोसायटयांनी २४ हजार ५३०  क्विंटल धान खरेदी केली आहे.
नागभीड तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकºयांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात असा आजवरचा अनुभव आहे.
आदिवासी विकास महामंडळाकडून शासनाने मागील वर्षीप्रमाणेच तालुक्यातील नऊ आदिवासी सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. 
प्रत्यक्षात ही धान खरेदी ३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे.आदिवासी विकास महामंडळाचे  हमीभाव १८८८ व १८३५ रुपये आहेत. धान विक्रीवर बोनसही दिला जातो. मात्र यावर्षी या बोनससंदर्भात अद्याप सूचना प्राप्त झाल्या नसल्याची माहिती संबंधित सुत्रांनी दिली. 
मिळत असलेले योग्य दर लक्षात घेऊन शेतकºयांनी धान विक्रीसाठी आपला मोर्चा आदिवासी सोसायट्यांकडे वळविला आहे.परिणामी मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता धान खरेदीचे अधिकार असलेल्या सोसायट्यांसमोर शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेले धान ठेवण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
टोकन पद्धतीचा अवलंब 
आदिवासी विकास महामंडळाने कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन टोकण पद्धती सुरू केली आहे. सोसायट्यांनी किंवा आदिवासी विकास महामंडळानेअगोदर केलेल्या आवाहनानुसार शेतकºयांनी धान विक्रीची नोंदणी करून घेतली आहे. ज्या शेतकºयाचा नंबर असेल त्या शेतकºयास सूचना देऊन बोलाविण्यात येते आणि काटा करण्यात येतो. त्यामुळे गर्दी होत नसल्याची माहिती आहे. 

अशी आहे सोसायट्यांची धान खरेदी 
आदिवासी विकास महामंडळाने ज्या सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत त्यात नवखळा सोसायटीने १४२१.२७ क्विंटल, चिंधी चक सोसायटीने ४३०५.८८ क्विंटल, गोविंदपूर २१७५.०९ क्विंटल, कोजबी (माल) सोसायटीने २७६०.९९  क्विंटल, गिरगाव सोसायटीने २१६१.१२ क्विंटल, सावरगाव सोसायटीने ५१५७.३७ क्विंटल, जीवनापूर सोसायटीने १६१०.९७ क्विंटल, बाळापूर सोसायटीने २८०३.८६ क्विंटल आणि वाढोणा सोसायटीने २१३३.८८ क्विंटल धानाची खरेदी केली आहे. याशिवाय पणन महासंघातर्फे नागभीड येथील खरेदी विक्री संघा व कोर्धा येथील श्री गुरूदेव राईस मील येथेही धान खरेदी सुरू आहे. मात्र या ठिकाणी धानाची किती  खरेदी झाली याचा तपशिल मिळू शकला नाही .

Web Title: Purchase of 24,000 quintals of paddy from nine societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.