समाज हितासोबत देशहितही जोपासा : देवराव भोंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:44 AM2021-02-23T04:44:22+5:302021-02-23T04:44:22+5:30
आवाळपूर : समाज एकत्रित करणे आणि समाज घडविणे ही मोठी बाब आहे. आधुनिक काळात समाज हा विस्कळीत होत चालला ...
आवाळपूर : समाज एकत्रित करणे आणि समाज घडविणे ही मोठी बाब आहे. आधुनिक काळात समाज हा विस्कळीत होत चालला आहे. त्याची मोठ बांधणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे सुशिक्षित लोकांनी समोर येऊन समाजाला शिक्षित करणे काळाची गरज बनली असून, समाजहितासोबत देशहित जोपासले पाहिजे, असे प्रतिपादन माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी नांदा फाटा येथील श्री संत नगाजी महाराज मूर्ती स्थापना दिवस सोहळ्यात व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देवराव भोंगळे, हरीश ससनकर, पुरुषोत्तम आस्वले, संजय मुसळे, पुरुषोत्तम निब्रड, रत्नाकर चटप उपस्थित होते.
यावेळी धिडशी येथील नवनिर्वाचित सरपंच रिना हनुमंते व दिल्ली येथील परेडमध्ये जिल्हाचे नेतृत्व करणारी नाजुका कुसराम यांचा शाल, श्रीफळ व नगाजी महाराज यांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला. संचालन नितीन शेंडे यांनी केले, तर प्रास्ताविक सतीश जमदाडे व आभार अखिल अतकारे यांनी मानले.