रत्नापूर येथे धान खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:30 AM2021-09-22T04:30:54+5:302021-09-22T04:30:54+5:30

सिंदेवाही तालुक्यात मुख्य पीक धानाचे घेतले जात असून अलिकडे पाण्याच्या सोयींमुळे धानाच्या उत्पादनात वाढ होत आहे. परंतु उत्पादन ...

Pushback among farmers for registration of paddy purchase at Ratnapur | रत्नापूर येथे धान खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की

रत्नापूर येथे धान खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की

Next

सिंदेवाही तालुक्यात मुख्य पीक धानाचे घेतले जात असून अलिकडे पाण्याच्या सोयींमुळे धानाच्या उत्पादनात वाढ होत आहे. परंतु उत्पादन खर्च वाढत असल्याने व धानाला पुरेसा भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळत असून निराशा वाढत असल्याचे चित्र आहे. यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने सर्वत्र आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले आहेत.

याचाच भाग म्हणून सेवा सहकारी संस्था मर्यादित रत्नापूर येथे खरीप धान खरेदी हंगाम २०२१ करिता ऑनलाईन नोंदणीची सोमवारी सकाळी १० वाजतापासून सुरुवात होणार होती. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी आपले धान खरेदीसाठी लवकर नंबर लागावा, म्हणून सकाळी ७.३० पासूनच लाईन लावली. गर्दी वाढतच गेल्याने शेवटी धक्काबुक्की झाली. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.

210921\img-20210920-wa0002.jpg

आधारभुत धान खरेदी नोंदणीसाठी नागरीकांनी अशी गर्दी केली होती

Web Title: Pushback among farmers for registration of paddy purchase at Ratnapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.