अजगराने केली बकरीची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:50 PM2017-09-16T22:50:09+5:302017-09-16T22:50:24+5:30
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून बफर झोनमधील व चिमूरपासून पाच किमी अंतरावर असलेल्या....
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून बफर झोनमधील व चिमूरपासून पाच किमी अंतरावर असलेल्या तुकूम गावाजवळील शिवारातील भाग्यवान खिरटकर यांच्या शेतात अजगराने बकरीची शिकार केली. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता घडली.
येथील बकºया चराईसाठी राखनदार हा तुकूम गावालगत एक किमी अंतरावर शेत शिवारात घेऊन गेला होता. दरम्यान भाग्यवान खिरटकर यांच्या शेताजवळ बकºया चारत असताना अजगराने बकºयाच्या कळपातील एका बकरीला पूर्णपणे विळखा घालून खाली पाडले.
दरम्यान बकरीच्या संपूर्ण शरीराला वेढा दिला. त्यामुळे बकरीचा मृत्यू झाला. ही बाब, राखनदाराच्या लक्षात आल्यावर त्याने आरडाओरड केली. परिसरातील नागरिकही धावून आले. याची माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली. दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाºयांनी अजगराच्या तावडीतून बकºयाची सुटका क0ेली.
यावेळी सदर बकरी मृतावस्थेत आढळून आली. यावेळी वनविभागाच्या कर्मचाºयांनी तसेच नागरिकांनी पिशवीच्या साह्याने अजगराला पकडून पोत्यात भरुन त्याला जंगलात सोडले. हा अजगर बारा फूट लांब असल्याचा वनविभागाचा अंदाज आहे. मृत बकरी दुर्योधन जांभुळे यांच्या मालकीचा होता.