गुणवंत हेच देशाचे आधारस्तंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:57 PM2018-06-25T22:57:04+5:302018-06-25T22:57:37+5:30
क्षेत्र कोणतेही असो. या क्षेत्रातील गुणवंत हेच देशाच खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असतात. गुणवंतांचा सन्मान करणे ही देशाची संस्कृती व परंपरा आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व अन्य क्षेत्रात कार्य करणाºय संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : क्षेत्र कोणतेही असो. या क्षेत्रातील गुणवंत हेच देशाच खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असतात. गुणवंतांचा सन्मान करणे ही देशाची संस्कृती व परंपरा आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व अन्य क्षेत्रात कार्य करणाºय संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे यांनी केले.
भाजपा चंद्रपूर महानगराच्या वतीने रविवारी स्थानिक माता कन्यका परमेश्वरी सभागृहात पार पडलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी अडीचशे गुणवंत विद्यार्थ्यांचा ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नाना शामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, चांदा पब्लिक स्कुलच्या अध्यक्ष स्मिता जीवतोडे, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू कीर्तीवर्धन दीक्षित, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रूंगठा, जि.प. समाज कल्याण सभापती, ब्रिजभूषण पाझारे, उपस्थित होते.
आ. नाना श्यामकुळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यासाला महत्त्व दिले पाहिजे. गरजू विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. यावेळी निवडक सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ. चोपणे म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगला छंद जोपासावा. स्वयंनिष्ठा ध्येयनिष्ठा, सत्यनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा, अध्ययननिष्ठा व समाजनिष्ठेकडे दुर्लक्ष करू नये. प्रास्ताविक राहुल सराफ तर संचालन नासिर खान यांनी केले. आभार शितल कुळमेथे यांनी केले.
देशासाठी समर्पित तरूणाईची गरज : हंसराज अहीर
विद्यार्थी हेच उद्याच्या पिढीचे प्रणेते आहेत. युवकांनी रोजगाराबरोबरच स्वयंरोजगार करता यावा यासाठी अनेक योजना सरकारने सुरू केल्या. आर्थिक प्रगती करून समाज व राष्ट्रसेवेसाठी समर्पित तरूणाईची आज खरी गरज आहे. त्यासाठी महापुरूषांपासून प्रेरणा घ्यावी, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.