शिक्षकांच्या कार्यशक्तीवरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:19 AM2021-06-29T04:19:30+5:302021-06-29T04:19:30+5:30

चंद्रपूर : शिक्षकांनी आपली ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती वाढवून नावीन्याचा ध्यास घेतला तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये नक्कीच बदल होईल. ...

The quality of the students depends on the workforce of the teachers | शिक्षकांच्या कार्यशक्तीवरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता

शिक्षकांच्या कार्यशक्तीवरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता

Next

चंद्रपूर : शिक्षकांनी आपली ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती वाढवून नावीन्याचा ध्यास घेतला तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये नक्कीच बदल होईल. पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांनी आपली ज्ञानशक्ती व कार्यशक्ती वाढवून आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तामध्ये बदल घडवून आणला. इतर शिक्षकांनी आपल्या परीने कार्यशक्ती वाढविल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच नक्कीच बदल होईल, असा विश्वास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे प्राचार्य धनंजय चाफले यानी व्यक्त केला.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरतर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या स्पर्धकांचा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील सभागृहात पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रल्हाद खुणे, अधिव्याख्याता संजय कुमार मेश्राम, अधिव्याख्याता ज्योती रजपूत आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संजय कुमार मेश्राम, संचालन कल्पना बनसोड तर आभार अमोल बल्लावार यांनी मानले.

कार्यक्रमासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या सर्वांचे सहकार्य लाभले.

बाॅक्स

यांना मिळाला पुरस्कार

प्राथमिक गट २०१९-२० : गोवर्धन नामदेव टिकले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कसरगाव, सावली प्रथम, द्वितीय क्रमांक हिशोदकुमार तुरे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जिवती, तृतीय रजनी मोरे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरुर

माध्यमिक शिक्षक गट : उमेश वसराम राठोड माध्यमिक शिक्षक शासकीय आश्रमशाळा जिवती, संतोष नन्नावरे लोक विद्यालय तळोधी नागभीड

प्रोत्साहनपर : रेखा वासुदेव लोहोकरे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुसा, वरोरा,

पूर्व प्राथमिक विभाग २०२०-२१

शीतल भूमर पर्यवेक्षिका, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, भद्रावती.

द्वितीय क्रमांक प्रतिभा बलकी, प्राथमिक विभाग नागेश सुखदेवे

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, भोयेगाव तालुका कोरपना

द्वितीय क्रमांक : रजनी श्यामराव मोरे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरूर, तृतीय क्रमांक अमर नारायण कसगावडे शहीद भगतसिंग प्राथमिक शाळा मनपा चंद्रपूर, चवथा क्रमांक उमेश नारायण आत्राम पंडित जवाहरलाल नेहरू इंग्रजी माध्यमिक शाळा मनपा चंद्रपूर, पाचवा क्रमांक

तुकाराम यादव धंदरे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आसन तालुका कोरपना. उत्तेजनार्थ : गणपत शंकर घाडगे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उपरवाही, माध्यमिक विभाग : पंकज वामनराव मत्ते जनता विद्यालय सिटी ब्रांच बल्लारपूर, संजय ठाकरे, जनता विद्यालय धाबा गोंडपिपरी

अलका ठाकरे विषय सहायक मराठी यांचे एससीईआरटीच्या रिसर्च बुलेटिनमध्ये रिसर्च पेपर प्रसिद्ध झाल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

Web Title: The quality of the students depends on the workforce of the teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.