बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पुलाचा प्रश्न रेंगाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:20 AM2017-11-20T00:20:56+5:302017-11-20T00:22:00+5:30
बल्लारशाह रेल्वे स्थानकाची सीमा दक्षिण भारताला जोडणारी आहे. रेल्वेचे मोठे जंक्शन येथे असून येथे एकूण पाच फलाट आहेत.
अनेकश्वर मेश्राम ।
आॅनलाईन लोकमत
बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकाची सीमा दक्षिण भारताला जोडणारी आहे. रेल्वेचे मोठे जंक्शन येथे असून येथे एकूण पाच फलाट आहेत. रेल्वे प्रवाशांना फलाटावर ये-जा करण्यासाठी लोखंडी पूल आहे. मात्र सदर पूल जीर्र्ण अवस्थेत असल्याने प्रवाशांचा जीवाला धोका आहे. असे असतानाही रेल्वे प्रशासन निधीचा तुटवडा दर्शवून याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे बल्लारशाह रेल्वे पुलाचा प्रश्न रेंगाळला आहे.
येथील रेल्वेस्थानक दरम्यान जुन्या वस्तीला जोडणाऱ्या रेल्वेच्या लोखंडी पुलाची देखील अशीच अवस्था झाली आहे. मध्यंतरी रेल्वे प्रशासनाने या रेल्वे पुलाची डागडुजी करण्यासाठी दोन ते तीन दिवस पादचाºयांसाठी बंद ठेवला होता. परिणामी ये-जा करणाºया नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागली होती. त्यावेळी रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नागरिकांना कोणतीही सूचना देण्याचे सौजन्य दाखविले नव्हते.
विशेष म्हणजे, पावसाळ्याच्या दिवसात वर्धा नदीला पूर आल्यास हाच पूल ये-जा करणाऱ्यांना उपयुक्त ठरतो. फलाटावर ये-जा करणारा व वस्ती विभागाला जोडणारा जुना लोखंडी पूल कालबाह्य अवस्थेत आहे. येथील रेल्वे स्थानकावर पाच फलाट असल्याने एकाच वेळेत दोन ते तीन प्रवाशी रेल्वे आल्यास प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्यामुळे पुलावरुन लोकांचा लोंढा वाहतो. परिणामी अपघाताची शक्यता बळावली असून दुघर्टना घडू शकते.
हा प्रकार टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने यावर आताच उपाययोजना करणे गरजेचे आहे. मुंबई येथील घटनेची पुर्नरावृत्ती टाळण्यासाठी रेल्वग अधिकाऱ्यांनी दक्षता बाळगून येथील रेल्वे पुलांचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी आहे.
८० वर प्रवासी गाड्यांचे अवागमन
बल्लारशाह रेल्वे स्थानक मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे सर्वच प्रकारच्या प्रवाशी रेल्वेचा थांबा आहे. प्रवासी रेल्वेच्या अवागमनामुळे येथील रेल्वे स्थानकाचा विस्तार होणे आवश्यक आहे. एक्स्प्रेस, सुपर एक्स्प्रेस, प्रवाशी गाड्या, राजधानी एक्स्प्रेससह जवळपास ८० च्या वर प्रवासी गाड्याचे येथून आवागमन असते. काही साप्ताहिक एक्स्प्रेस असल्या तरी येथील रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्या दृष्टीने प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणे क्रमप्राप्त आहे. मात्र रेल्वे प्रशासनातील अधिकारी निधीची कमतरता दर्शवून सुविधा पुरविण्यास टाळाटाळ करण्याचे धोरण अवलंबित आहेत.
बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील जुना पूल कालबाह्य झाला. नवीन पुलाचे बांधकाम आवश्यक आहे. यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांना निवेन सादर करुन पाठपुरावा करण्याची विनंती केली. याबाबत झेडआरयुसीसी व डीआरयुसीसी सभेतही प्रश्न मांडला. मात्र निधीचा अभाव दर्शवून रेल्वे प्रशासन टाळाटाळ करीत आहे. प्रवाशांच्या सोईसाठी नवीन पुलाचे बांधकाम गरजेचे आहे.
- श्रीनिवास सुंचूवार
अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोशिएशन, बल्लारपूर .