घुग्घूस तालुका निर्मितीचा प्रश्न प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:43 AM2020-12-15T04:43:44+5:302020-12-15T04:43:44+5:30
धुळीचे प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त माजरी : कोळसा उद्योगांमुळे माजरी शहर सर्वदूर परिचित आहे. मात्र या कोळसा खाणीच्या होणाऱ्या वाहतुकीमुळे ...
धुळीचे प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त
माजरी : कोळसा उद्योगांमुळे माजरी शहर सर्वदूर परिचित आहे. मात्र या कोळसा खाणीच्या होणाऱ्या वाहतुकीमुळे शहरात धूळ प्रदूषण वाढले आहे. बऱ्याच वाहनावर ताडपत्री झाकून राहत नसल्याने कोळसा रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
देऊरवाडा येथील तीर्थक्षेत्राचा विकास करावा.
भद्रावती : तालुक्यातील देऊरवाडा येथे अनेक धार्मिक ठिकाण आहे. त्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन येथील पायाभूत विकास घडवून आणावा, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी सुविधा पुरविण्यात आल्यास येथील पर्यटन विकास साधला जाईल.
चिमूर - नंदोरी मार्गावर बसफेऱ्या वाढवा
खडसंगी : चिमूर येथून कोरा मार्गे नंदोरीसाठी बसफेऱ्या वाढविण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. या मार्गावर अत्यल्प बसेस असल्याने प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागते. याचा फटका सर्वसामान्य येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना बसतो आहे.
गोंडपिपरी - गडचांदूर बससेवा सुरू करा
गोंडपिंपरी : येथून तोहोगाव मार्गे गडचांदूरसाठी थेट बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या बस सेवेमुळे कमी अंतरात व आर्थिक बचतीत प्रवाशांना प्रवास करता येईल. याचा लाभ गोंडपिपारी व राजुरा तालुक्यातील नागरिकांना होईल.