विनापरवाना अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:29 AM2021-02-24T04:29:59+5:302021-02-24T04:29:59+5:30
शहरातील अनेक मोठे किराणा दुकानदार आणि शॉपिंग मॉल यांच्याकडे किराणा धान्य, सुकामेवा आणि इतर खाद्य वस्तू विनापरवाना हवाबंद पॅकेजिंग ...
शहरातील अनेक मोठे किराणा दुकानदार आणि शॉपिंग मॉल यांच्याकडे किराणा धान्य, सुकामेवा आणि इतर खाद्य वस्तू विनापरवाना हवाबंद पॅकेजिंग करून विकल्या जात आहे. त्यावर कुठलीही निर्मितीची आणि उपयोगाच्या अंतिम तिथीची नोंद राहात नाही. नियमानुसार कोणतीही अन्नप्रक्रिया न करता पॅकेजिंग केले जात आहे. पॅकेजिंग केलेल्या वस्तूंच्या वापराची अंतिम तिथी आणि गुणवत्ता कळत नाही. त्या वस्तू खाण्यायोग्य आहे किंवा नाही हेही कळत नाही. कित्येकदा पॅकेजिंग वस्तू खराब निघतात.
काही ठिकाणी तर पॅकेजिंग तारीख आणि अंतिम तिथी संपली की त्यावर पेनाने खोडतोड करून पुढची तारीख लिहिल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अन्नपदार्थांचे सेवन केल्यास मानवी आरोग्याला धोका होऊ शकते.
हे सर्व लक्षात घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रवीण चिमुरकर, वामन नामपल्लीवार, वसंत वऱ्हाटे, अशोक शेंडे आणि गोपीचंद कांबळे यांनी अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर तथा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.