कापूस विक्रीसाठी वाहनांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:33 AM2021-01-08T05:33:02+5:302021-01-08T05:33:02+5:30
---- जळाऊ लाकडे उपलब्ध करून द्या चंद्रपूर : जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात आली होती. मात्र कोरोना काळात नागरिकांचे ...
----
जळाऊ लाकडे उपलब्ध करून द्या
चंद्रपूर : जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात आली होती. मात्र कोरोना काळात नागरिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेकांकडे सिलिंडर भरण्याइतकेचे पैसे नसल्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करीत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना जळाऊ लाकडे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
---
पथकातील सर्वांचीच चाचणी करावी
चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यामध्ये निवडणूक पथकातील काही सदस्यांचीच कोरोना चाचणी केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण पथकाचीच कोरोना चाचणी करावी, अशी मागणी केली जात आहे. यासंदर्भात काही शिक्षक संघटनांनी प्रशासनाला निवेदनही दिले आहे.
---
भंगार हटविण्याची मागणी
चंद्रपूर : येथील प्रशासकीय भवन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भंगारातील वाहनेे तसेच इतर साहित्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे इतर वाहने ठेवण्यासाठी अडचण होत आहे. सोबतच परिसराची दुरवस्थाही झाली आहे. त्यामुळे भंगार वाहनांचा लिलाव करून जागा मोकळी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
-----
सॅनिटायझर मशीन बंद
चंद्रपूर : कोरोना काळात अनेक शासकीय कार्यालयांमध्ये सॅनिटायझर लावण्यासाठी मशीन बसविण्यात आल्या होत्या. मात्र, यातील अर्ध्याअधिक बंद पडल्या आहे. त्यामुळे कर्मचारी तसेच येणारे नागरिक सॅनिटायझर न लावताच कार्यालयात प्रवेश करीत आहे. त्यामुळे भविष्यात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
---
सुटीच्या दिवशीय बॅंका सुरू ठेवाव्यात
चंद्रपूर : जानेवारी महिन्यामध्ये बॅंकेला मोठ्या प्रमाणात सुट्या आहे. त्यामुळे ग्राहकांना कामकाज करण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशीही बॅंका सुरू ठेवण्याची मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे.
---
नागपूर रस्त्यावरील वाहनांना हटवावे
चंद्रपूर: चंद्रपूर-नागपूर मार्गावरील जनता काॅलेज ते ट्रायस्टार होटलपर्यंत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाहने ठेवली जातात. यामध्ये काही गॅरेज संचालक तसेच विक्रेतेही वाहने ठेवत असल्यामुळे अनेकवेळा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक विभाग तसेच महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ही वाहने हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
------
पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण करावे
चंद्रपूर : शहरातील विविध भागांमध्ये महापुरुषांचे पुतळे लावण्यात आले आहेत. मात्र, नियमित देखभाल केली जात नसल्याने पुतळा परिसराची दयनीय अवस्था झाली होती. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नियमित स्वच्छता करावी तसेच पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
--