जनतेच्या समस्या त्वरित सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:26 AM2017-11-08T00:26:00+5:302017-11-08T00:26:12+5:30

सामान्य नागरिक, शेतकºयांच्या, शेतमजुरांच्या प्रश्नाची त्वरित उकल करुन त्यांना न्याय द्या, प्रश्न सोडविण्यास हयगय करणाºया कर्मचाºयांवर कारवाई केली जाईल, ....

Quickly solve public issues | जनतेच्या समस्या त्वरित सोडवा

जनतेच्या समस्या त्वरित सोडवा

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : भाजपच्या जनता दरबारात शेकडो प्रश्न निकाली

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : सामान्य नागरिक, शेतकºयांच्या, शेतमजुरांच्या प्रश्नाची त्वरित उकल करुन त्यांना न्याय द्या, प्रश्न सोडविण्यास हयगय करणाºया कर्मचाºयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी उपस्थित अधिकाºयांना दिला.
सामान्य नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी राजुरा विश्रामगृहात भाजपचा जनता दरबार घेण्यात आला. या दरबारात ते बोलत होते. यावेळी अनेक नागरिकांनी ना. अहीर यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. यावेळी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनीही अधिकाºयांना नागरिकांचे प्रश्न गंभीरतेने सोडविण्याबाबत सूचना केल्या. राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे यांनी कामात कामचुकार करणाºयांवर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, उपविभागीय अधिकारी एम. दयानिधी, तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, राजुºयाचे ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे, बीडीओ एस. रामावत, वन परिक्षेत्र अधिकारी अशोक मेडपल्लीवार, उपविभागीय अभियंता एस. बी. टांगले, कनिष्ठ अभियंता एम. जोशी, डॉ. अशोक जाधव, वाघू गेडाम, अरुण मस्की, जि. प. सदस्य सुनील उरकुडे, राहुल सराफ, राजू घरोटे, अ‍ॅड. प्रशांत घरोटे, राजेंद्र कागदेलवार, सचिन डोहे, सचिन शेंडे, सतिश जोशी यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
नोकरी व मोबदल्याचे दर जुन्या पॉलिसीनेच -पियुष गोयल
नवी दिल्ली येथे केंद्रीय कोळसामंत्री पियुष गोयल यांची ना. हंसराज अहीर यांनी भेट घेतली. यावेळी ना. पियुष गोयल यांनी वेकोलिमधील सातही प्रकल्प पोवनी-३, बेलोरा नायगाव डिप, निलजई एक्सटेन्शन, सास्ती युजी टू ओसी, चिंचोली रिकास्ट, उकनी एक्सटेंशन, मंगोली डिप एक्सटेन्शन आणि पुढे ज्या प्रकल्पाचे अधिग्रहण सीबी एक्ट १९५७ नुसार करण्यात येत आहे, तेथे अधिग्रहण नसून सीबी एक्ट मधील १४ (१) या कलमाखाली करारनामा आहे. शेतकरी व कंपनी यांच्यामधील तो आपसी समझोता असल्यामुळे यापुढे या सर्व प्रकल्पाना १४ (१) नुसार मोबदल्याचे दर जुनाच म्हणजे एकरी आठ ते १० लाख रुपये देण्यात येतील व जुन्या पॉलीसीनीच सीआयएल २०१२ नुसार नोकºया सुद्धा देण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी ना. हंसराज अहीर यांना दिली. याप्रसंगी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे उपस्थित होते.
अहीर यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता
वन्यप्राणांच्या त्रासामुळे होणाºया नुकसान भरपाईसाठी शेतकºयांचे वनविभागासमोर उपोषण सुरु होते. ना. हंसराज अहीर यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे उपस्थित होते.

Web Title: Quickly solve public issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.